• Fri. Apr 24th, 2026

एएसपी पंकज कुमावात यांची जुगार अड्ड्यावर धाड 11,80,050 रूपयाचा मुद्देमाल व आरोपी ताब्यात.

Bybaba maske

Nov 10, 2023

एएसपी पंकज कुमावात यांची जुगार अड्ड्यावर धाड 11,80,050 रूपयाचा मुद्देमाल व आरोपी ताब्यात.

रोखठोक न्युज वार्ताहर 

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांची बीड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पत्त्याच्या क्लब वर धाड 17 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेसह एकूण 25 आरोपी वर गुन्हा दाखल करुन एकूण किमती 11,80,050/-(अकरा लाख एंशी हजार पन्नास रुपये) रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

सविस्तर माहिती अशी की, मा. पंकज कुमावत साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की चऱ्हाटा फाटा ता.जि. बीड येथे तुकाराम नगरच्या पाठीमागे तांदळे यांच्या शेडमध्ये काही इसम अंदर बाहर नावाचा जुगार पत्त्याच्या पानावर पैसे लावून खेळत आहेत, अशी माहिती मिळाल्याने स्वतः पंकज कुमावत साहेब यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे सह सदर ठिकाणी दिनांक 09/11/2023 रोजी 19.30 वाजता रेड करुन 17 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेसह एकूण 25 आरोपी वर गुन्हा दाखल करुन नमूद आरोपी कडून एकूण किमती 11,80,050/-(अकरा लाख एंशी हजार पन्नास रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुण 25 आरोपी विरुद्ध पोलीस नाईक दिलीप गीते यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतः एएसपी पंकज कुमावत साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज व त्यांच्या पथकातील psi आनंद शिंदे, बाबासाहेब डापकर, दिलीप गीते, अनिल मंदे, भरत शेळके, गोविंद मुंडे, महादेव बहिरवाळ, शमीम पाशा तसेच आरसीपी बीड येथील राठोड, जाधव, खेडकर, धनवे व पवार यांनी केली आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!