सुरेश कुटे चा अखेर भाजपात प्रवेश.लोकसभेचे भावी उमेदवार म्हणून चर्चा. दिवाळी नंतर होणारा भाजप प्रवेश ओबीसी नेते तथा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्वात आजच करून का घेतला?
सुरेश कुटे चा अखेर भाजपात प्रवेश.लोकसभेचे भावी उमेदवार म्हणून चर्चा.
दिवाळी नंतर होणारा भाजप प्रवेश ओबीसी नेते तथा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्वात आजच करून का घेतला?
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा ‘द कुटे ग्रुप ‘ चेसर्वेसर्वा सुरेश कुटे यांचा अखेर भाजपप्रवेश झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे कुटे यांनी भाजपात प्रवेश केला. कुटे ना भविष्यात भाजप बीड लोकसभेच्या मैदानात उतरवेल अशी चर्चा आहे.देवेंद्र फडणवीस यांचा पंकजाताई यांना चेकमेट दिला अशी चर्चा आहे.दिवाळी नंतर होणारा प्रवेश सोहळा आजच उरकून घेतला तो ही ओबीसी नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते. यावेळी अर्चना कुटे यांचीही उपस्थिती होती.
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि ‘द कुटे ग्रुप ‘च्या माध्यमातून देशभर ओळख असलेले सुरेश कुठे यांच्या कुटे उद्योग समूहावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यावेळेपासून सुरेश कुटे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे दाम्पत्त्य भाजपात प्रवेश करील अशा अटकळी अनेक दिवसांपासून बांधल्या जात असतानाच आज (दि. १०) कुटे यांनी जाहीरपणे भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रवेश दिला. या प्रवेशाने आता बीड जिल्ह्यातील भाजपमधील अनेक समीकरणे बदलणार आहेत. विशेष म्हणजे या प्रवेशावेळी बीड जिल्ह्यातील भाजपचा कोणताही मोठा पदाधिकारी उपस्थित नव्हता