• Fri. Apr 24th, 2026

टक्चेवारी वाटून काम मिळवण्यात “यश”आल पण काम बोगस होऊ लागल.उमरीरोड,मंगळवार पेठ,रोज्जा मोहल्ला, वार्ड क्रमांक 8, .76 कोटीतुन कांही खिशात तर काही पाण्यात.

Bybaba maske

Nov 14, 2023

टक्चेवारी वाटून काम मिळवण्यात “यश”आल पण काम बोगस होऊ लागल.

उमरीरोड,मंगळवार पेठ,रोज्जा मोहल्ला, वार्ड क्रमांक 8, .76 कोटीतुन कांही खिशात तर काही पाण्यात.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरात महाराष्ट्र सुवर्ण जंयती नगरोत्थान योजनेतून 76 कोटीचा निधी उपलब्ध झाला,ते काम शहरात करण्या साठी नगरपंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र लागत होते.ही नगरपंचायत च्या सत्ताधारी जनविकास आघाडीला चालुन आलेली आयती संधी होती कारण सत्ता आल्यापासूनच विकास ठप्प होता.ही चालुन आलेली संधी लोंकाच्या आलेल्या कराच्या पैशातून नगरपंचायत आवारात मोठा मंडप टाकून मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडल.निवेदा काढून काम हे नावाजलेल्या यश कन्स्ट्रक्शन लातूर या कंत्राटदाराला दिल.त्या मध्ये आर्धा उमरीरोड,मंगळवार पेठ ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजीमहाराज चौक काॅर्नर पंर्यत,वार्ड क्रमांक 8, येथील रस्ता,या मध्ये काम भेटल्या पासुन कमिशन साठी साठमारी चालू झाली,ती कशीतरी संपली पण त्या मध्ये अतिक्रमण काढून रस्ते करण्या ऐवजी जस्सा आहे त्या स्थितीत रस्ता व नाली बनवायला चालु केली.त्या मध्ये रस्ता तर कमी होतच आहे पण रस्ता लहान होत असल्या कारणाने बजेट कमी लागत.जिथे 33 फुटाचा रस्ता आहे तिथे 15 फुट होत असेल तर किती बजेट लागत असेल? यात नगरपंचायत चा नगररचनाकार विभाग शांत दिसतोय.मुख्यधिकारी यांनी रस्ता मोजून देणे बंधनकारक असताना ते शांत आहेत.रस्त्याच्या मधोमध टेप लावून त्यांनी तो रस्ता व नालीच मोजमाप करणे गरजेच होत पण तसे झाल्याच दिसत नाही.त्यामुळेच नाली वेडीवाकडी तर रस्ता लहान होत आहे यातच यश कन्स्ट्रक्शन च “यश” दिसुन येत आहे.76 कोटीतुन टक्केवारी वाटून राहीलेलेया रक्कमेत आपला नफा ठेवून जर काम करायचे असेल तर मग काम तर असेच करावे लागेल.जनतेन निवडून दिलेल्या ज्यांच्या घशात ही टक्केवारी कोंबली आहे ते गप्पगार आहेत.ज्यांना टक्केवारी देऊन तोंड बंद केले असेल तर आवाज कोण उठवणार?असे आता जनता म्हणत आहे.

नगरपंचायत चा मिंधे पणा का? तर उमरीरोड बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कोणाच्या दबावाला बळी पडत आहे? असे प्रश्न आता जनतेतून विचारले जात आहेत? 76 कोटीतुन होणाऱ्या कामाच आता ऑडिट झाले पाहिजे व क्वालिटी कंट्रोल कडून यांची गुणवंता तपासली पाहीजे.जो रस्ता नगरपंचायत ने आखून दिलेला व तेवढ्या लांबी रूंदीचा झाला पाहीजे.33 फुटाचा रोड चे रुंदीकरण हे तेवडेच झाली पाहीजे व कन्स्ट्रक्शन ला जेवढा रस्ता केला तेवढा परतावा भेटला पाहिजे नसता वंचित बहुजन आघाडी कडुन यांची  तक्रार दिवाळी संपल्या नंतर मुख्यमंत्र्यांसह सर्व तत्सम कार्यालयात पुराव्या सहीत केली जाईल.

जे अंबाजोगाई अतिक्रमण काढून रस्ते केले जातात ते केज मध्ये का होत नाहीत?

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!