• Fri. Apr 24th, 2026

अंबाजोगाई येथे अतिक्रमण काढून रस्ते तयार होतात!तर केज मध्ये का नाही? राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती केज मध्येच का संपते? यश कन्स्ट्रक्शन ची काय जादू झाली नेतृत्वावर?

Bybaba maske

Nov 15, 2023

अंबाजोगाई येथे अतिक्रमण काढून रस्ते तयार होतात!तर केज मध्ये का नाही?

राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती केज मध्येच का संपते?

यश कन्स्ट्रक्शन ची काय जादू झाली नेतृत्वावर?

रोखठोक न्युज वार्ताहर 

तसा पाहिला तर केज विधानसभा हा फक्त नावालाच, नावालाच काय फक्त मतदाना पुरता.मतदार संघ नावापुरता म्हटला तर विकास ही नावालाच.पहिल्या पासूनच केज व तालुक्याच्या बाबतीत दुजाभाव आहेच. त्यात आमचे केज तालुक्यातील नेते म्हणजे फक्त पायाशी लोळण घेणारे.पण कधी नाहीते या वेळेस आमदार नमिताताई मुंदडा यांनी महाराष्ट्र सुवर्ण महोत्सव नगरोत्थान योजनेतून 76 कोटीचा निधी आला या योजनेतून आता कमीत कमी केज शहरातील रस्ते सुंदर होतील अशी अपेक्षा होती. पण 76 कोटी ची रक्कम बघून हर्षवायू झालेले शहर पुढारी आपल्या वाट्याला किती येते याचाच विचार करू लागले.गुत्तेदार ठरवला गेला!शहर आराखडा विसरून तुला कसा रस्ता,नाली करायची तसी कर म्हणून डोळेझाकुन नगरपंचायतने परवानगी दिली.सगळेच शहरातील रस्ते नाली बनवायच आदनच यश कन्स्ट्रक्शन ला दिल गेल आणि केज शहरातील ग्रहित धरलेल्या जनतेच्या तोंडाला पाने पुसत आपले पोट भरून घेतल.आज यश कन्स्ट्रक्शन च ऐवढे धाडस झाले आहे की उमरीरोड ची नाली बांधताच भगदाड पडायला सुरुवात झाली आहे.अजून रोड तर बनवायचा लांबच आहे.शहरातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद (इंडिया) येथून तर नागमोडी नाली तयार केली आहे त्या मुळे रस्त्याची रूंदी कमी होणार आहे.हिच अवस्था वार्ड क्रमांक 8 मध्ये झाली आह.येथे तर लोंकाच्या प्लाॅटीग मधून नाल्या बांधल्या जात आहेत.

अंबाजोगाई येथील काम पाहिल तर याच यश कन्स्ट्रक्शन कडे आहे,पण तेथेतील नगरपरिषदे असो की स्थानिक आमदार नमिताताई यांनी अगोदर रस्त्याच्या दुतर्फा आतिक्रमन काढून घेतल.भगवानबाबा चौक,छत्रपती शिवाजीमहाराज चौक,स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय मार्गे यशवंतराव चव्हाण चौका पंर्यत सर्व अतिक्रमण काढून रस्ता बनवत आहेत.पुढच्या तीस वर्षाच नियोजन आहे.आणि आपल्या केज शहरात स्वतःच्या पोटाची खळगी भरणाऱ्या नेतृत्वाने टक्केवारी घेऊन आणखी दहा वर्ष मागे घेऊन गेले.अश्या परिस्थितीत केज च्या जनतेच काय चुकल?

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!