• Fri. Apr 24th, 2026

मळीकर साहेब जरा 76 कोटीच्या गुत्तेदाराला मळाकी!यश कन्स्ट्रक्शन सगळ्या कामाच पिठ करायला आहे.का तुमच्याच चक्कीत दळतोय गुत्तेदार पिठ?आपना काम बनता भाड मे जाये जनता.या उक्तीनुसार नगरपंचायतने वागू नये.

Bybaba maske

Nov 16, 2023

मळीकर साहेब जरा 76 कोटीच्या गुत्तेदाराला मळाकी!

यश कन्स्ट्रक्शन सगळ्या कामाच पिठ करायला आहे.

का तुमच्याच चक्कीत दळतोय गुत्तेदार पिठ?

आपना काम बनता भाड मे जाये जनता.या उक्तीनुसार नगरपंचायतने वागू नये.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरात महाराष्ट्र सुवर्ण महोत्सव नगरोत्थान योजनेंतर्गत 76 कोटीतुन

1)केज येथे राष्ट्रीय महामार्ग. ते सार्वजनिक स्मशानभूमी, कानडी रोड नगर पंचायत हद्दीपर्यंत सिमेंट कॉक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे ता. केज, जि. बीड

2)केज येथे येडबा रोडे यांचे घर ते खुर्शीदभाई यांचे प्लॉटपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे ता. केज, जि. बीड

3)केज येथे टिपू सुलतान रोड ते चिंचोली रोड, विट भट्टीपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे ता. केज, जि. बीड

4)केज येथे कानडी रोड ते सर्वेक्र. ७८ रोड पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे ता. केज, जि. बीड

5)केज येथे पोस्ट ऑफिस ते दत्त मंदिर रोडपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे ता. केज, जि. बीड

यातील फक्त राष्ट्रीय महामार्ग ते स्मशानभूमीचे काम चालु नाही बाकी सर्व कामे चालू आहेत.नगरपंचायत ने नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे.व त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की जे कामे प्रस्तावित आहेत त्यात कुठलेही अतिक्रमण नाही.मग प्रश्न असा पडतो की नाली वेडीवाकडी का तयार होत आहे.नाली वेडीवाकडी होत आहे म्हणजे रस्त्याच्या कडेला ज्याचे अतिक्रमणीत घरे आहे किंवा समोरचे पायर्‍या,ओटा हे न काढताच त्याला वळण देऊन नाली करत असल्या कारणाने नाली रस्त्यावर येत आहे,त्यामुळेच रस्ता आपोआप लहान होत आहे.हे सगळ्या कामावर देखरेख करण्याच काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करणे आवश्यक आहे.त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोणी अभियंत्याची निवड केली आहे का? का स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभिंयता लक्ष देत आहेत? जर ते स्वतः लक्ष देत असतील तर काम बोगस कसे होत आहे?

नाली रस्त्यावर का बांधली जात आहे.काल सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी व्हिडीओ द्वारे काम कसे बोगस होत आहे ते दाखवले.त्यांनी फक्त उमरीरोड चा व्हिडीओ दाखवला.पण तसेच काम पोस्ट ऑफिस ते रोज्जा मोहल्ला येथे होत आहे,तिच परिस्थिती वार्ड क्रमांक आठ(8) मध्ये आहे.मग प्रश्न पडतो नगरपंचायत ने तर नाहरकत प्रमाणपत्र देऊन आपली जिम्मेदारी झटकली आहे.तरी पण आपल्या हद्दीत कसे काम होते ते विकासाच्या गपाट्या मारणाऱ्या नगरपंचायत च्या सत्ताधाऱ्यांने बघावे लागते.

“आपना काम बनता भाडमें जाये जनता.”या उक्तीनुसार वागू नये.कालच्या व्हिडीओ तुन स्पष्ट होतय की गुत्तेदार हे काम थातूरमातूर करून काम आवरायच बघत आहे.पण मळीकर साहेब हे तुमचे काम आहे, गुत्तेदार कसे काम करतोय ते बघायचे.त्यात तुम्ही का डोळे झाक करत आहात?याची सर्वस्वी जिम्मेदारी तुमची आहे.या कामात भ्रष्टाचार होतय हे लहान मुल ही सांगेल हे तात्काळ थांबवून अ‍ॅक्शन घ्या असे जनतेत बोलले जात आहे.नाहीतर केजची जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय रहाणार नाही.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!