• Mon. Aug 3rd, 2026

भिक्षुकाला हसून भिक्षा दिली, भावाची बहिणीला मारहाण

Bybaba maske

Nov 13, 2023

भिक्षुकाला हसून भिक्षा दिली, भावाची बहिणीला मारहाण

रोखठोक न्युज वार्ताहर 

 भिक्षुकाला हसून भिक्षा का दिलीस ? या कारणावरून भावाने बहिणीला लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना केज तालुक्यातील कानडीमाळी येथे शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. या प्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल आहे. सुलभा जालिंदर कळमकर या कानडीमाळी येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरासमोर त्यांचा भाऊ राजाभाऊ नंदकुमार राऊत राहतो. शुक्रवारी सकाळी एक भिक्षुक घरासमोर आल्याने सुलभा यांनी भिक्षुकास भिक्षा दिली. त्या भिक्षुकाला हसून भिक्षा का दिलीस ? या कारणावरून सुलभा यांना राजाभाऊ याने शिवीगाळ केली. तसेच प्लास्टिकच्या पाइपने हातावर तर कपाळावर दगड मारून जखमी केले. लाथाबुक्क्यांनी पोटात, कमरेवरही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राजाभाऊ नंदकुमार राऊत याच्या विरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू गुंजाळ हे तपास करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!