सिझेरियनच्या भीतीने पळाली अन् जंगलात प्रसूत नवजात बाळासह तिने जंगलात काढली रात्र.
रोखठोक न्युज वार्ताहर
प्रसूतीसाठी चुरणी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या आदिवासी महिलेला तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सिझेरियन करण्याच्या निर्णय घेतला. हे ऐकून पोट कापले जाणार या भीतीने गर्भवतीने रुग्णालयातून पळ काढत एसटीने गाव गाठले; परंतु, बसमधून उतरताच प्रसूती कळा सुरू झाल्याने जंगलात रस्त्यावरच तिने बाळाला जन्म दिला. रात्र जंगलात काढल्यानंतर सकाळी तिने एका झोपडीत आश्रय घेतला.
हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना तालुक्यातील खुटिदा येथे बुधवारी घडली. कविता दिनेश धिकार (२८, रा. खुटिदा) असे महिलेचे नाव असून, ती चौथ्यांदा गर्भवती होती.
रुग्णालयातून परतवाडा – भांडूम एसटी बसने ती गावी निघाली. रस्ता पूर्ण खड्डेमय असल्याने बसमध्येच तिला प्रसूतकळा आल्या. बसमधून उतरताच काही वेळात जंगलातच प्रसूत झाली. ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी आरोग्य यंत्रणेला कळविले.