• Tue. Aug 25th, 2026

एसबीआय बँके समोर “हातपाय मोड खड्डा” यश कन्स्ट्रक्शन ने खोदून ठेवला.

Bybaba maske

Nov 17, 2023

एसबीआय बँके समोर “हातपाय मोड खड्डा” यश कन्स्ट्रक्शन ने खोदून ठेवला.

रोखठोक न्युज वार्ताहर

केज शहरात 76 कोटीच्या विकास निधी खाली भष्टाचार चालू आहे.सगळ्या केज मध्ये जोरदार काम चालू असल्याचे दाखवून थातूरमातूर कामे चालू आहेत.क्वॉलिटी कंट्रोल कुठल्याही कामात दिसत नाही.त्याच अनुशंगाने एसबीआय बँके समोर नाली खोदून ठेवली आहे.पुर्ण एक महिना उलटून गेला तरी तिथले काम केले नाही.सगळ्यात जास्त वर्दळ असणारी एसबीआय बँक(जुनी हैदराबाद) रोज्जा मोहल्ल्यात आहे.या बँकेत वयोवृद्ध,अपंग यांची पेशंन येथे होत असते तसेच तालुक्यातील सरकारी,निमशासकीय कर्मचारीवर्गांची पगार,पेन्शनर्स ची पगार येथे होते तसेच बँकेचे ग्राहक या सगळ्याची बँकेत जाताना कसरत होत आहे ऐन बरोबर बँकेच्या समोरच मोठा लठ्ठ खड्डा खोदून ठेवलाय जसे काय बँकेच्या ग्राहकाने बँकेत जाऊ नये म्हणुन रस्ताच अडवलाय का काय असा अभास निर्माण होतो.या खड्यात किती तरी वयोवृद्ध पडून जखमी झाल्याचे तसेच कोणाचा हात तर कोणाचा पाय मोडल्याचा तिथल्या स्थानिक लोंकानी सांगीतल आहे.अगोदर तर त्यात सळाया होत्या पण नंतर त्या काढून घेतल्या दिवाळीच्या आधी खुप गर्दी असताना त्या खड्ड्यात काही पडले अडखळले त्यामुळे सळया काढून घेतल्या.  यश कन्स्ट्रक्शन ला आपल्या कामा समोर जनतेची थोडी सुद्धा काळजी नसल्याच जाणवत.त्यामुळे लवकरात लवकर या हातपाय मोड खड्यावर नाली बांधकाम करावे व ग्राहकाची सोय करावी असे एसबीआय बँकेतील कर्मचारीवर्ग म्हणत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!