• Fri. Apr 24th, 2026

मळेकर साहेब दिवाळी खाऊन झाली असेल तर 76 कोटीचे निघणारे दिवाळे थांबवा!! नाहीतर अबोलीच्या झाडाला शंकेची फळे येत रहातात !!

Bybaba maske

Nov 18, 2023

मळेकर साहेब दिवाळी खाऊन झाली असेल तर 76 कोटीचे निघणारे दिवाळे थांबवा!!

नाहीतर अबोलीच्या झाडाला शंकेची फळे येत रहातात !!

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरात चालु असलेले 76 कोटीचे कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चालू असताना.शहरातील जनता,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार आवाज उठवत आहेत रोजच्या रोज केलेल्या कामाचा व त्यात झालेल्या निकृष्ट कामा बद्दल रोज पत्रकार लिहीत आहेत,सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवत आहेत,त्या त्या भागातील रहिवाश्यांची ओरड चालू असताना,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिपावली साजरा करायला आपल्या गावा कडे गेल्याचे बोलले जात आहे.असे आधिकारी जर तालुक्याला लाभले असेल तर काम असेच होणार.वार्ड क्रमांक 8 मध्ये तर सगळा सावळागोंधळ चालू आहे.नगरपंचायत ने अतिक्रमण नाही सगळी नगरपंचायत ची जागा आहे म्हणून नाहरकत दिले आहे त्याच्यावर ना नगररचनाकार ची स्वाक्षरी नाही किंवा अन्य कुठल्याच जिमेद्दार व्यक्तीची स्वाक्षरी आहे. मग ते नाहरकत प्रमाणपत्र खरे कसे समजणार?रस्ता करताना टिपु सुल्तान चौकातून टाकळी कडे जाणार्‍या रस्त्या पर्यंत काम करायचे आहे तर गुत्तेदार चिंचोली कडे जाणार्‍या रस्ता करतोय.सदरील काम नकाशा प्रमाणे होतय का नाही हे बघण्याचे काम कोणाचे आहे अशी जनतेत चर्चा आहे.आता तरी मळीकर साहेब दिपावली खाऊन ढेकर दिला असेत तर आपल कर्तव्य बजावत 76 कोटीच्या कामाचा होत असलेला चुराडा थांबवा अशी जनता कळकळीची विंनती करत आहे.नाहीतर मग अबोलीच्या झाडाला शंकेची फळे आल्या शिवाय रहात नाहीत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!