• Wed. Apr 22nd, 2026

रस्त्यावर पडलेल्या भेगात चाक अडकून अपघात एकाचा मृत्यू. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग वरच्या निकृष्ट कामाचा बळी. मनोज जरांगे-पाटील आले अपघात ग्रस्ताच्या मदतीला धावून.

Bybaba maske

Dec 12, 2023

रस्त्यावर पडलेल्या भेगात चाक अडकून अपघात एकाचा मृत्यू.

खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग वरच्या निकृष्ट कामाचा बळी.

मनोज जरांगे-पाटील आले अपघात ग्रस्ताच्या मदतीला धावून.

रोखठोक न्युज वार्ताहर 

माजलगाव ते तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेंगामध्ये दुचाकीचे चाक अडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अब्दुल हाफिज सत्तार खान (४९) असे मृताचे नाव असून ते पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचे कर्मचारी होते.

खामगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. या भेगांमध्ये चाक अडकून दररोज मोठ्या प्रमाणावर दुचाकीचे अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. आज पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचे कर्मचारी अब्दुल हाफिज सत्तार खान (४९) हे कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर आपल्या घरी सिरसाळा येथे दुचाकीवरून जात होते. रिलायन्स पेट्रोल पंपा समोरील रस्त्यावरील भेगात चाक अडल्याने दुचाकी (एम.एच.३८ ए ७२१८) उलटली. डोक्याला जबर मार लागल्याने दुचाकीस्वार अब्दुल हाफिज सत्तार खान जागीच गतप्राण झाले. या घटनेनंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात आले.

मनोज जरांगे यांनी घेतली धाव

दरम्यान, मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे धारूर येथून माजलगाव तालुक्यातील सभेसाठी याच मार्गवरून जात होते. अपघाताची माहिती मिळताच जरांगे यांनी लागलीच गाडी थांबवत धाव घेतली. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जरांगे पुढे गेले

baba maske

Related Post

ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते
केजमध्ये ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन – भाई मोहन गुंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!