• Tue. Jun 23rd, 2026

धावत्या कारला अचानक लागलेल्या आगीत प्रवाशाचा जळून मृत्यू  

Bybaba maske

Dec 21, 2023

धावत्या कारला अचानक लागलेल्या आगीत प्रवाशाचा जळून मृत्यू.

रोखठोक न्युज वार्ताहर 

अंबाजोगाई जवळील घटना धावत्या सीएनजी कारला अचानक लागलेल्या आगीत चालका शेजारी बसलेल्या सीटवरच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बर्दापूर येथील पेट्रोल पंपाजवळ राष्ट्रीय मार्गावर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. सदरील कारचा मालक लातूर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  1. बुधवारी एम.एच.०८ आर ७८७९ या क्रमांकाची कार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लातूरकडे निघाली होती. तालुक्यातील बर्दापूर जवळ पेट्रोल पंपा नजीक राष्ट्रीय महामार्गावर सदरील कारने अचानक पेट घेतला. आगीमध्ये ही कार संपूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळतच बर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन अंबाजोगाई नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. आग विझविल्यानंतर त्या ठिकाणी कार मध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचा आगीत जळून मृत्यू झाल्याचे आढळून आले. कारचा चालक व इतर कारमधील प्रवाशी त्या ठिकाणी नव्हते.आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट नसून अन्य महत्त्वाची माहिती बर्दापूर पोलीस घेत आहेत. पोलिसांनी पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह स्वाराती रुग्णालयात दाखल केला. मृतदेहाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. दरम्यान, कारने सोलार खांबाला धडकून पेट घेतल्याचाही दावा काहींनी केला आहे. अधिकृत माहिती पोलीस तपासानंतर समोर येऊ शकणार आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!