केज तहसीलदार तुम्ही कार्यकारी दंडाधिकारी अहात विसरलात का? महसूल नायब तहसीलदार यांचा तर विचार न केलेला बरा.सर्व शासकीय, निमशासकीय.नागरी संस्था या मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे
केज तहसीलदार तुम्ही कार्यकारी दंडाधिकारी अहात विसरलात का?
महसूल नायब तहसीलदार यांचा तर विचार न केलेला बरा.
सर्व शासकीय, निमशासकीय.नागरी संस्था या मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तहसील चे तहसीलदार हे नावालाच दंडाधिकारी असल्याचे जाणवत आहे.कुठलेही निवेदन दिले तर ते फक्त फाॅरवर्ड(पुढे पाठवायचे) ऐवढेच काम करायला ही खुर्ची सरकारने दिली आहे का? आपल्या आखतारीत सर्व तालुका त्यातील सर्व कार्यालय,सर्व नागरी संस्था येतात त्यावर अंकुश ठेवण्याच काम खरे तर आपले आहे.तालुक्यातील आलेल्या शासकीय निधी वापरावर आपला अंकुश असने स्वभावीक असताना आपण दुर्लक्षा शिवाय काही करत नसल्याच दिसून येत आहे.त्यामुळेच सर्व शासकीय, निमशासकीय.नागरी संस्था या मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे.तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तुमच्या कडे तालुक्यातील नागरिक भष्टाचार असो किंवा कुठल्या कार्यालयातील भोंगळपणा किंवा नागरिकांचे संवैधानिक अधिकारावर गद्दा येत असेल तर त्याचा निपटारा करण्याचे काम तहसीलदार म्हणून आपले आहे.पण आपण ते सगळ विसरल्याचे दिसून येत असल्याचे जनतेत व पिडीत नागरिका मध्ये चर्चेला जात आहे.सर्व तालुक्यातील कार्यालय व त्यातील आधिकारी हे आपल्या आखतारीत येतात एकाद निवेदन असेल किंवा भ्रष्टाचार असेल तर आपण तसा अहवाल शासनास पाठवू शकतात.एक माहिती अधिकार कार्यकरता अजय भांगे दोन दिवस आपल्या कार्यालया समोर या जिवघेण्या थंडीत एच पी एम कंपनीने रस्त्याच्या केलेल्या भष्टाचार विरोधात सर्व पुरावे घेऊन उपोषण करतो तर त्याला फाॅरवर्ड केलेल्या व तिकडून आलेल्या खोट्या पत्रवाळी शिवाय काय भेटल? एचपीएम कंपनी म्हणते की आम्ही सर्व कामे केले.अहो तहसीलदार साहेब तुमच्या कार्यालया समोरील रस्त्या लगत ची नाली सुद्धा केली नाही.याचा जबाब नागरिकांनी विचारायाचा का तहसीलदाराने? तुमच्या महसूल व पुरवठा विभागात घोटाळेच घोटाळे आहेत.उत्खनन पासुन धान्या पंर्यत सर्व घोटाळेच.तुमचा तलाठी जनतेला चुर चुर चुरतोय.बोगस नोंदी होतायत.एका जमिनीच्या तुकड्या साठी चार चार जण भांडतायत! रस्त्याचे कामे सरकारी निधी तुन बोगस होत आहेत.सार्वजनिक बांधकाम,कृषी कार्यालय,वनविभाग, पंचायत समिती,याच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कधी मिंटीग लावली काव साहेब.यांच्या विरोधात दिलेल्या निवेदनाची फक्त केलेली फाॅरवर्ड काॅपी निवेदकाच्या कपाळी मारली जाते? असे कुठ पंर्यत चालणार दंडाधिकारी साहेब?