• Fri. Apr 24th, 2026

तहसीलदारांच्या आदेशाला त्यांचेच कर्मचारी मानत नाहीत तर मग हे कसले दंडाधिकारी? तलाठी,व मंडळ अधिका-याची मनमानी

Bybaba maske

Dec 23, 2023

तहसीलदारांच्या आदेशाला त्यांचेच कर्मचारी मानत नाहीत तर मग हे कसले दंडाधिकारी?

तलाठी,व मंडळ अधिका-याची मनमानी

रोखठोक न्युज वार्ताहर 

तालुक्यातील विडा महसुल मंडळाचे मंडळ अधिकारी सुहास डोरले व जिवाचीवाडी सज्जाचे तलाठी, उत्रेश्वर घुले  यांना तहसिलदार अभिजीत जगताप यांनी हनुमान वस्ती,जिवाचीवाडी  येथील शेक-यांना नोटीस काढुन घटनास्थळी जाऊन 

दि.9 मे. 2022 रोजी जीवाचीवाडी ते चारधरी शिवा पर्यंत शासकीय नकाशा वरील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढणे बाबत लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मागणी केली होती,

याबाबत मंडळ अधिकारी यांनी दोन वर्षात सहा वेळेस पाहणी केली त्यांच्या अहवाला नुसार तत्कालीन तहसीलदार दुल्हाजी मेंडके यांनी सदरील रस्त्याची स्थळ पाहणी केली पुढे तहसीलदारांच्या आदेशान्वये दि. 29 मे.2023 रोजी तलाठी,मंडळ अधिकारी,भुमिअभिलेख,केज. यांनी पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करून देत असताना मंडळ अधिकारी व स्थानीक पोलीसांच्या संगणमताने अतिक्रम काढणेचे काम चालु असताना मध्येच बंद केले,सदरील रस्त्यावर परत त्याच शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. कालांतराने तहसीलदार दुल्हाजी मेंडके यांची बदली झाली व अभिजीत जगताप, तहसीलदार,केज.म्हणून रुजू झाले त्यांना मंडळ अधिकारी सुहास डोरले यांनी सदर रस्त्याबाबत चुकीची माहिती सादर केल्याने रस्त्याचे प्रकरण प्रलंबीत पुन्हा लांबणीवर पडले .परत दुसऱ्यांदा तहसिलदार जगताप 

यांनी दि. 24 /8/ 2023 रोजी दुसऱ्यांदा रस्त्याची स्थळ पाणी केली यानंतर 20/ 9/2023 रोजी पर्यायी रस्ता करण्याबाबत आदेश दिले. आदेशाच्या प्रती मंडळ अधिकारी विडा,तलाठी सज्जा जीवाचीवाडी व संबंधित शेतकरी यांना देण्यात आल्या याला पण तीन महिने होऊनही संबंधित विडा मंडळाधिकारी,सुहास डोरले.जीवाचीवाडी सज्जाचे तलाठी,उत्तरेश्वर घुले.हे  तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून वेळ काढून नेत आहेत हे लक्षात आले  वर शेतकऱ्यांनी डोरले यांच्या विरोधात जिल्हाधिकारी,उप जिल्हाधिकारी व तहसीलदार केज, यांना लेखी तक्रार दिली आहे  जीवाचीवाडी सज्जाचे तलाठी,उत्तरेश्वर घुले,यांनी फोन घेतला ते म्हणाले मी कामात आहे वेळ भेटल्यानंतर आम्ही दोघेही येऊ सदरील कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचे नियंत्रण दिसून येत नाही यांच्या हलगर्जीपणामुळे गेले तीन वर्ष रस्त्याचे काम रखडत पडलेले आहे याचा परिणाम वस्ती वरील नागरीक अर्थिक,मानसीक,श्रमीक त्रास भोगत आहेत हनुमान वस्ती वरील काही शेतकरी मरण पावले काही आजारी पडले काही स्थलांतर होऊन पुणे,मुंबईला गेले आणखी किती वर्ष लागेल हा रस्ता होण्यास अशी चर्चा वस्ती वरील नागरीक करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!