• Fri. Apr 24th, 2026

ऊसतोड मजुराचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या दारात.खुनाचा गुन्हा दाखल करेपर्यंत अंत्यविधी नातेवाईकांची मागणी.

Bybaba maske

Dec 23, 2023

ऊसतोड मजुराचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या दारात.खुनाचा गुन्हा दाखल करेपर्यंत अंत्यविधी नाही.नातेवाईकांकडून मागणी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

होलार समाजाच्या ऊसतोड मजुराचा मृतदेह परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या दारात

संबधितावर गुन्हा दाखल करेपर्यंत अंत्यविधी नाही, नातेवाईक आक्रमक,पोलिसांची दिरंगाई

परळी प्रतिनिधी. होलार समाजाच्या ऊसतोड मजुराचा मृतदेह परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या दारात नातेवाईकांनी आणून ठेवला आहे.जोपर्यंत मारहाण करुन मृत्यूस जबाबदार ठरणार्या ऊसतोड मुकादम व गाडीमालकावर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.दरम्यान मारहाण झाल्यानंतर नातेवाईकांनी ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला होता व तक्रार दाखल करुन घेण्याची मागणी केली होती.याप्रकरणी पोलिसांची दिरंगाई व टाळाटाळ आरोपींना वाचविणारी दिसत आहे.

     तालुक्यातील मौजे दौंडवाडी येथील डिंगाबर मरिबा पारसे या ऊसतोड कामगारास मुकादम व गाडीमालकाने दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी मारहाण करून त्याच्या घरी जखमी अवस्थेत आणून टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना केला. नातेवाईकास अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित ऊसतोड कामगाराचा अपघात नसून त्याचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.जख्मी अवस्थेत त्यांना लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा लातूर येथेच मृत्यू झाला.

    याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर मरीबा पारवे हे बालाघाट येथील कारखान्यास ऊस तोडण्यासाठी गेले होते. दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी गाडी मालक वैजनाथ दौंड, मुकदम भाऊराव पवार यांनी दिगंबर मरीबा पारसे यांना जखमी अवस्थेत त्यांच्या घरी रात्री साडेअकरा वाजता आणून सोडले. व धर्मापुरी ते आनंदवाडी दरम्यान अपघात झाला असल्याचे त्यांनी नातेवाईकास सांगितले.नातेवाईकांनी दिनांक 11 डिसेंबर रोजी लातूर येथे शासकीय जिल्हा रुग्णालय येथे त्यांना उपचारासाठी घेऊन गेले असता तेथून त्यांनी पुढील उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे रेफर केले. उपचारादरम्यान दि.२२ डिसेंबर 2023 दिगंबर मरिबा पारसे यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मयताचे प्रेत ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरच ठेवणार असल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

   दरम्यान सदरील ऊसतोड कामगार दिगंबर मरीबा पारसे यांचा मृत्यू हा अपघातात झाला नसून मुकदम व गाडी मालक यांनी त्यास मारहाण केली असून ही मारहाण पैशाच्या देवाणघेवाणीतून झाले असल्याचा आरोप मयताचे पुतणे दौंडवाडी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पारसे यांनी केला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!