• Fri. Apr 24th, 2026

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण.

Bybaba maske

Dec 24, 2023

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण.

रोखठोक न्युज वार्ताहर 

देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांची मोठी चिंता वाढली आहे. पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. याच दरम्यान आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर अधिवेशनानंतर चाचणी केल्यानंतर कोरोना झाल्याचे आढळले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नागपूर अधिवेशन झाल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. सध्या मुंडे हे त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी कॉरंटाइन आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

मागच्या दोन दिवसापासून धनंजय मुंडे यांना खोकला आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी कोरोनाची चाचणी केली. यामध्ये त्यांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जगभरातील काही देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल आहे. भारतातही गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!