• Fri. Apr 24th, 2026

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. केज शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ दिनकर राऊत व सचिव डाॅ भाऊसाहेब चाळक व सहकाऱ्यांकडून पदग्रहण.

Bybaba maske

Dec 25, 2023

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

केज शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ दिनकर राऊत व सचिव डाॅ भाऊसाहेब चाळक व सहकाऱ्यांकडून पदग्रहण.

रोखठोक न्युज वार्ताहर 

दि.२४ – आयएमए तालुका पदाधिकाऱ्यांची घोषणा झाल्यानंतर राज्यातील वरिष्ठ पदाधिकऱ्यांचा उपस्थितीत नूतन पदाधिकऱ्यांचा पदग्रहन समारंभ (दि.२३) रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न झाला.

                          संपूर्ण देशभरातील डॉक्टरच्या न्याय हक्कासाठी झगडणारी आणि रुग्णांच्या प्रति सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारी संघटना म्हणून आयएमए कडे पाहिले जाते. देशातील सुमारे 25 राज्यात ही संघटना कार्यरत असून लाखो डॉक्टर्स या संघटनेचे सदस्य आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या आय एम ए केज तालुका संघटनेची नव्याने बांधणी झाली आहे. केज तालुका संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून उपजिल्हा रुग्णालयाच्या भव्य हॉलमध्ये पदग्रहण समारंभ पार पडला. यामध्ये आयएमएचे तालुकाध्यक्ष म्हणून निष्णात बालरोगतज्ञ डॉ. दिनकर राऊत, उपाध्यक्ष म्हणून डॉ. शशिकांत केंद्रे, सचिव म्हणून डॉ. भाऊसाहेब चाळक, सहसचिव म्हणून डॉ. बालासाहेब सोळंके तर कोषाध्यक्ष म्हणून डॉक्टर बालासाहेब सावंत यांनी पदभार स्वीकारला.

                     सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भास्कर खैरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून एसआरटी मेडिसिन विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुटे, माजी अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण लोंढे, आयएमएचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर काकडे, आयएमएचे माजी राज्य उपाध्यक्ष डॉ. रमेश भराटे, केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय केंद्रे, राज्यसहसचिव डॉक्टर राजेश इंगोले, केजचे माजी अध्यक्ष डॉक्टर त्र्यंबक चाटे, डाॅ केशव इंगोले,डॉ बालासाहेब सोळंके डॉ सायस केंन्द्रे,डाॅ ठोंबरे,व केज शहरातील खाजगी व्यवसायिक डॉक्टर उपस्थित होते. मेजर शांतिनाथ बनसोडे यांची यावेळी उपस्थिती होती.

             केज उपजिल्हा रुग्णालयाच्या भव्य हॉलमधील सदरील कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेची गरज आणि महत्त्व पटवून दिले. तर नूतन अध्यक्ष डॉक्टर दिनकर राऊत यांनी केज तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील डॉक्टर्सना अद्यावत तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून आयएमएच्या वतीने विविध उपक्रम राबविणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. सदलील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण नागरगोजे यांनी केले तर आभार डॉक्टर सचिन राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी तालुक्यातील नामवंत डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!