दिव्यांगाचा निधी तात्काळ वाटप करा नाहीतर नगरपंचायत वर मोर्चा काढणार: राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब गुंड.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरातील 140 दिव्यांगाचा निधी आज पंर्यत नगरपंचायत ने वाटप केला नाही.नगरपंचायत च्या नियमानुसार दिव्यांगाना मदत म्हणून शासकीय नियमानुसार दिव्यांगाना पाच टक्के निधी वितरित करावा लागतो पण आजतागायत केज नगरपंचायतने निधी वाटप केलेला नाही.त्यामुळे अंपगाची हेळसांड नगरपंचायत करत असल्याची जाणीव दिव्यांग बांधवा मध्ये आहे.याच निधी वाटपाचा विषय राष्ट्रवादी कॉग्रेस चे गटनेते तथा नगरसेवक यांनी वेळोवेळी नगरपंचायत च्या निदर्शनास आणून दिले पण सत्ताधारी जनविकास परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्षाने या कडे दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस चे नगरसेवक भाऊसाहेब गुंड यांनी दिव्यांगाचा निधी तात्काळ वाटप झाला नाहीतर सर्व दिव्यांग बांधवाना सोबत घेऊन नगरपंचायत वर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात येईल असे रोखठोक न्युज शी बोलताना व्यक्त केला.
