• Fri. Apr 24th, 2026

बनावट कागदपत्राद्वारे मनरेगातील विहिरीचे अनुदान लाभार्थी, मजुरांच्या परस्पर उचलले. केज तालुक्यातील शेलगावगांजी येथील प्रकार; बीडीओ, सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवकावर फसवणुकीचा गुन्हा रोजगार सेवक आणि तांत्रिक

Bybaba maske

Dec 27, 2023

बनावट कागदपत्राद्वारे मनरेगातील विहिरीचे अनुदान लाभार्थी, मजुरांच्या परस्पर उचलले.

केज तालुक्यातील शेलगावगांजी येथील प्रकार; बीडीओ, सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवकावर फसवणुकीचा गुन्हा रोजगार सेवक आणि तांत्रिक

रोखठोक न्युज वार्ताहर

बनावट कागदपत्राच्या आधारे प्रस्ताव तयार करून मनरेगाची विहिर मंजूर केली. त्यानंतर बोगस मजुरांच्या नावाने बँकेत खाती काढून २ लाख ९० हजार रूपयाचे परस्पर अनुदान उचलल्या प्रकरणी केज पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक,

अधिकाऱ्यांविरोधात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील शेलगावगांजी येथील शेतकरी साहेबराव सखाहरी जाधव यांची साळेगाव शिवारातील वडिलोपार्जित सर्व्हे नंबर-१६६ मध्ये दोन एकर जमीन आहे. त्या वडीलोपार्जीत जमीनीत पोट खराबा क्षेत्रात पूर्वीची जुनीच चाळीस फुट खोल विहीर आहे. ती विहीर पोट खराब क्षेत्रात असल्याने त्या विहिरीची सातबारावर नोंद नाही. या विहीरीतील पाणी हे साहेबराव जाधव व त्यांचे भाऊ वापरीत आहेत. सन- २०२२ मध्ये मनरेगा योजनेंतर्गत गावातील शेतकऱ्यांना जलसिंचन विहिरी मंजुर झाल्या होत्या. मात्र साहेबराव जाधवहे विहीरीसाठी पात्र असताना देखील त्यांचे नाव मंजूर यादीत नसल्याने त्यांनी चौकशी केली. त्यावेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, त्यांना कळविले की, त्यांच्या नावाने सन-२०१६-१७ मध्ये विहीर मंजुर झाली होती. त्यासाठीचे मंजूर झालेले २ लाख ९० हजार रूपयाचे अनुदान वितरित झाल्याचे कागदपत्रेवरून आढळून आले आहे. त्यानंतर साहेबराव जाधव यांनी प्रकाराविषयी अधिक चौकशी केली असता त्यांना माहिती मिळाली की, त्यांनी स्वतः विहिरीची मागणी केलेली नसताना त्यांच्या नावाने बनावट प्रस्ताव सादर करू पंचायत समितीत विहीर मंजूर केली. सदरील विहीर न खोदता सर्वे नंबर १६६/२ दाखवून मनरेगाच्या जलसिंचन विहिरीचे सुमारे २ लाख ९० हजार रूपये उचलले असल्याचे समोर आले. या सर्व प्रकारास केज पंचायत समिती येथील तत्कालीन गटविकास अधिकारी, तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करून ती जलसिंचन विहिर कागदोपत्री खोदली असल्याचे खोटी कागदपत्रे तयार करून खोट्या सह्या करून व मजुरामार्फत खोदली असल्याचे बनावट नमुना नंबर ४ व जॉब कार्ड बनावट तयार करून तत्कालीन रोजगार सेवक यांनी तयार केली. हे काम पूर्ण झाल्याचे दाखवून मोजमाप पुस्तिका तत्कालीन तांत्रिक अधिकाऱ्यांनी सह्या करून देयके मंजुर करून ती उचलून अपहार केला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेले साहेबराव जाधव यांच्या तक्रारीवरून तत्कालीन गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक आणि तांत्रिक अधिकाऱ्यांविरोधात मंगळवारी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस जमादार बाबासाहेब बांगर हे करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!