• Fri. Apr 24th, 2026

नगरपंचायत चुकीच्या नाहरकत प्रमाणपत्रा मुळे,यश कन्स्ट्रक्शन ला नाल्या बुजवून द्याव्या लागल्या. नगरपंचायतच्या मुख्यधिकारी यांनी रस्त्याच्या मधोमध टेप लावून रस्ता मोजून द्यावा!

Bybaba maske

Dec 27, 2023

नगरपंचायत चुकीच्या नाहरकत प्रमाणपत्रा मुळे,यश कन्स्ट्रक्शन ला नाल्या बुजवून द्याव्या लागल्या.

नगरपंचायतच्या मुख्यधिकारी यांनी रस्त्याच्या मधोमध टेप लावून रस्ता मोजून द्यावा!

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरात नगरोत्थान योजनेंतर्गत 76 कोटीचे रस्ता व नाली बनवण्याचे कामे यश कन्स्ट्रक्शन या कंपनी कडून चालू आहेत.कामे चालू झाल्यापासून 76 कोटीचा निधी वादात सापडला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग केज अंतर्गत कामे चालू झाले त्यानंतर कसा बसा रोड व नाली करत असताना सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी बोगस कामाचा पर्दाफाश केला.मुळा मध्ये नगरपंचायत ने ज्या वेळेस नाहरकत प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागास दिले त्याच वेळेस जे रस्ते नगरपंचायत कडून सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरीत केले त्यावेळेस दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रात सदरील क्षेत्रास कोणतेही आतिक्रमन नाही असे नमूद केले होते.पण सदरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आतिक्रमन आहे.पोस्ट ऑफिस ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौका पंर्यत आतिक्रमन खूप प्रमाणात आहेत.आता या रस्त्यावर नाली बांधकाम चालू असून त्या भागातील रहिवाशांकडून या कामाला विरोध होत आहे.नगरपंचायत च्या मुख्याधिकाऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध टेप लावून रस्ता मोजून देणे गरजेच असताना असे काही होताना दिसत नाही.त्या मुळे रस्ता नाली अडवण्याचे काम नागरिक करत आहेत.त्यामुळे हा 33 फुटाचा रस्ता 15-20 फुटाचा होत आहे.जर नगरपंचायत च्या डिपी प्लॅन नुसार जर रस्ते नाली होत नसेल तर काय फायदा होणार कारण रस्ते हे अरूंदच रहाणार.आज पोस्ट ऑफिस समोरील खोदलेली नाली यश कन्स्ट्रक्शन ला बूजवून द्यावी लागली.मग ही नाली व रस्ता कसा होणार हा प्रश्न केजच्या जनतेत पडला आहे.जोपर्यंत नगरपंचायत चे मुख्यधिकारी मधोमध टेप लावून रस्ता मोजून देत नाही तो पर्यंत काहि होणे नाही.या मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची भुमीका संदिग्ध आहे.कारण नगरपंचायत च्या खोट्या नाहरकत प्रमाणपत्रावर हे सगळे कामे कसे करून घेत आहेत हे जनतेच्या समजने पलीकडचे आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!