• Fri. Apr 24th, 2026

केज तालुक्यात 5 स्टोन क्रेशर अनाधिकृत तर फक्त 4 स्टोन क्रेशर परवाना धारक.शासनाचा कोट्यावधी चा महसूल बुडवला.जिल्ह्य़ात 66 स्टोन क्रेशर अनाधिकृत असताना केज तालुक्यातील   एक ही अचटनाधिकृत ठरवली नाही.कोणाच्या आशिर्वादात चालतात अनाधिकृत क्रेशर?

Bybaba maske

Dec 28, 2023

केज तालुक्यात 5 स्टोन क्रेशर अनाधिकृत तर फक्त 4 स्टोन क्रेशर परवाना धारक.शासनाचा कोट्यावधी चा महसूल बुडवला.

जिल्ह्य़ात 66 स्टोन क्रेशर अनाधिकृत असताना केज तालुक्यातील   एक ही अनाधिकृत ठरवली नाही.

कोणाच्या आशिर्वादात चालतात अनाधिकृत क्रेशर?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यात एकूण 9 स्टोन क्रेशर आहेत त्यात फक्त 4 स्टोन क्रेशर ह्या अधिकृत आहेत गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांने जिल्ह्यातील 66 स्टोन क्रेशर अनाधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे केज तालुक्यात 5 स्टोन क्रेशर विनापरवाना चालत असताना याच्या कडे महसूल प्रशासनाचे लक्ष नाही.लक्ष नाही का कानाडोळा केला जातो हे समजत नाही.कोट्यावधी चा महसूल बुडविणारया ह्या स्टोन क्रेशर चालवणाऱ्या धेंडा कडे कुणाचे लक्ष नसल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे.या स्टोन क्रेशर ला खाण पट्टे कुठले दिले गेले व यांनी विना रॉयल्टी चे किती कोटी रक्कमेचे उत्खनन केले असेल? केज महसूल प्रशासनाच्या हे लक्षात कसे आले नाही.कित्तेक वर्षांपासून यांचे हे काळेधंदे चालत आहेत.गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या 66 स्टोन क्रेशर वर कारवाई केली त्यात या 5 स्टोन क्रेशर चा समावेश कसा केला नाही?”अंधळ दळतय कुत्र पिठ खातय” अशी केज तहसील कार्यालय व प्रशासनाची गत झाली आहे.आता या वर जिल्हाधिकारी काय भुमीका घेतात हे बघावे लागेल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!