• Fri. Apr 24th, 2026

देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे

Bybaba maske

Jan 3, 2024

देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे

रोखठोक न्युज वार्ताहर 

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या झालेल्या बैठकीत हिट एण्ड रन कायदा लागू करण्यात येणार नसल्याच आश्वासन मिळाल्यानंतर ट्रक टँकर चालकांचा संप मागे घेण्यात आला आहे.ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे.

सरकारसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. हिट अँड रन कायद्यामुळे देशभरातील टँकर आणि ट्रक चालकांच्या संघटनांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. या संपामुळे संपूर्ण देशाला दिवसभरात मोठा फटका सहन करावा लागला. या संपामुळे आज दिवसभर आणि काल संध्याकाळपासून अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांबाहेर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही पेट्रोल पंपमधील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला. त्यामुळे नागरिकांवर प्रचंड मनस्तापाची वेळ आली. या संपामुळे आज सकाळी भाजीपाला प्रचंड महागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक खूप अडचणीत सापडले होते. अखेर सरकार आणि ट्रक चालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने देशातील सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!