मोदीं रथ विकसित भारत संकल्प यात्रेच्या गाडीला विरोध!
चिंचोली माळीतील मराठा तरुन आक्रमक
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील तरुण मराठा बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्प यात्रेची गाडी गावात आली असता चिंचोली माळी येथील मराठा बांधवांनी गाडीची गावातुन हाकलून लावण्यात आली कारण मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन उभे केले आहे सरकार मराठा समाजाची पिळवणूक करत आहे आणी मराठा समाजाला सरसगट ओबीसींच्या ५० टाक्याच्या आतुन आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे तरी सुद्धा केंद्र सरकारला व महाराष्ट्र सरकारला जाग येत नाही म्हणून चिंचोली माळी येथील तरूण मराठा बांधवांनी गावात कुठल्याही प्रकारची विकास हवा नाही आता फक्त आम्हाला आरक्षण पाहीजे आहे म्हणून मोदींच्या विकसित भारत संकल्प यात्रेची गाडी गावातुन हाकलून लावण्यात आली जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळात नाही तोपर्यंत गावात कुठल्याही प्रकारची विकास योजना हवी नाही तसेच कुठल्याही प्रकारची विकास योजनाची गरज नाही.असे प्रदर्शन गावात होऊ देणार नाहीत असे यावेळी तरुण मराठा बांधवांनी व्यक्त केले.आता आम्हाला आरक्षण पाहीजे आरक्षण हाच आमचा विकास आहे, आरक्षण हीच आमची योजना आहे आता फक्त आम्हाला आरक्षण पाहीजे आहे गो बॅक मोदी विकसित भारत संकल्प अशा घोषणा देत चिंचोली माळी येथील तरूण मराठा बांधवांनी मोदींच्या विकसित भारत संकल्प यात्रेची गाडीची गावातुन हाकालपट्टी करण्यात आली आहे.
