2 लाख घेऊन लग्न केले ;खरेदी करण्याचे कारण सांगून नवरीचा पोबारा
लग्नाचे आमिष दाखवत 2 लाख रुपयांना गंडवले
रोखठोक न्युज वार्ताहर
पैसे देऊन लग्न लावले;खरेदी करण्याचे कारण सांगून नवरीचा पोबारा
आष्टी – आष्टी शहरातील एका फळविक्रेत्याने 2 लाख रुपये देऊन लग्न केले होते. अवघ्या 5 दिवसांत नवरीने कुटुंबीयांना खरेदी करण्यासाठी बाजारात चालले असे सांगून गुंगारा देऊन पोबारा केला आहे.याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात भांदवी 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी लक्ष्मण धोंडे यांच्या साडुच्या मुलास मुलगी दाखवतो म्हणून आरोपी माधव रामजी भालेराव मु.पो.मुसोड ता.कळमनुरी जि.हिंगोली याने मुलगी दाखवतो म्हणून 2 लाख रुपये घेतले दि.16 नोव्हेंबर रोजी मुलगी दाखवली या अगोदर एक मुलगी दाखवली परंतु ती पसंत पडली नव्हती हि मुलगी मुलाला पसंत पडल्यावर पाहणी झाली त्याच ठिकाणी हार घालून विवाह करण्यात आला व लगेच आरोपीने 2 लाखाची मागणी केली.व्यापा-याने ही 2 लाख दिले दि. 18 नोव्हेंबर रोजी पुन्हा आष्टी शहरात विवाह करण्यात आला परंतु 23 नोव्हेंबर रोजी खरेदीचे कारण सांगून नवविवाहित नवरी बाजारात गेली परत आलीच नाही संपर्क साधला परंतु मोबाईल ही बंद होता.मध्यस्थी ला संपर्क केला असता आजारी आहे.आज येईल उद्या येईल सांगण्यात आले व टाळाटाळ करण्यात येताच फसवणूक झाल्याचे लक्षात आले.यावरून आष्टी पोलीस ठाण्यात भादंवी 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे हे पुढील तपास करत आहेत.
