अनिल रेस्टॉरंट च्या दुर्गंधी युक्त पाण्याने समतानगरचे नागरिक हैराण.
नालीचा बंदोबस्त न केल्यास घरातील कचरा रेस्टॉरंट च्या बाहेर फेकला जाईल.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरातील बीड रोडवर असलेले अनिल रेस्टॉरंट हे आपल्या रेस्टॉरंट मधील सांडपाणी त्याचबरोबर भाज्या,सडलेले कांदे,बटाटा व कापलेल्या विविध भाज्या हे सांडपाण्या बरोबर नाली मध्ये सोडतात त्यामुळे नाली वहात नाही.त्यामुळे ओला कचरा व नालीचे पाणी यांचे मिश्रण होऊन दुर्गंधी युक्त पाणी नालीत साचले आहे.त्या मुळे समतानगर व येणारे जाणारे नागरीक त्रस्त झाले आहेत.प्रत्येक जनाला नाकाला रुमाल बांधून जावे लागते.नगरपंचायत च्या नियमानुसार सुका कचरा व ओला कचरा हा नगरपंचायत च्या घंटा गाडीत विघटन करून द्यावा लागतो पण अनिल रेस्टॉरंट याला अपवाद आहे.नगरपंचायत ने याच्या साठी वेगळा नियम तयार केला आहे का? तसेच नगरपंचायत ने नालीची साफसफाई करावी लागती ती जिम्मेदारी सुद्धा नगरपंचायत उचलत नाही.नगरपंचायत ने नियुक्त केलेला कचरा टेंडर वाला साफसफाई करतो का ? का फक्त बील सेंटीग आहे? कारण शहरातील प्रत्येक वार्डातुन कचरा उचलणाऱ्या साठी आरोप आहेत की ते नियमित कचरा उचलत नाहीत.नाल्या साफ करताना थातूरमातूर काम करून निघून जातात.नागरिकाचे ऐकत नाहीत.लवकरच या नालीचा बंदोबस्त झाला नाहितर सगळा घरातील कचरा समतानगर येथील रहिवास अनिल रेस्टॉरंट च्या दारात आणून टाकतील असे रोखठोक न्युज शी बोलताना सांगीतल.
अनिल रेस्टॉरंट ला या बाबत नगरपंचायत नोटीस देते का आता बघावे लागेल.समतानगरच्या नागरिकांची या दुर्गंधी तुन सुटका होईल का?
ओला व सुका कचरा विघटन न करणाऱ्या अनिल रेस्टॉरंट वर काय कारवाई होते ते का नगरपंचायत अभय देते?
