अवैध गर्भपात सेंटरचा अड्डा उद्वस्त; जिल्हा शल्यचिकीत्सक यांचा पथकाची कारवाई
जामीनावर सुटल्यावर मनीष सानपचा गर्भपाताचा धंदा चालुच ठेवला.

रोखठोक न्युज वार्ताहर
एक महिला (मनीषा सानप) व घरमालक (बबन चंदन शिव) त्यांना मदत करनारे दोन लोक असे एकूण चारजण ताब्यात घेण्यात आले
गेवराई दि 4 रोजी शहरातील संजय नगर परिसरात एका किरायच्या घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे व त्यांच्या टिमने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी छापा मारला तसेच या कारवाईत गर्भपात करनारी सामग्री व विविध मशीन सह मालका सह एक महिला ताब्यात घेतली असल्याची माहिती आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरात संजय नगर परिसरात अवैध गर्भपात केला जात असल्याची तक्रार बीड जिल्हा वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे प्राप्त झाली त्यानुसार सदर ठिकाणी खरोखर असा काही प्रकार सुरू आहे का? याबाबत बीड जिल्हा शल्यचिकित्सक यांनी डमी महिला तयार करून सदर फोन करूण याची पुष्टी केली तसेच या प्रकरणी बीड स्थानिक गून्हे शाखा व वैधकीय पथक यांनी सदर ठिकाणी ( दि 4 रोजी ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला व याठिकाणी एक महिला व घरमालक त्यांना मदत करनारे दोन लोक असे एकूण चारजण ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे तसेच याठिकाणाहून सोनाग्राफी मशीन व गर्भपात करनारी सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी पुढील कार्यवाही सूरु असुन आरोपी महिला ही नर्स असुन तिच्यावर काही महिण्यापुर्वी असा गून्ह्या संदर्भात कार्यवाई करण्यात आली होती जामिनवर सुटल्यानंतर तिने हा व्यावसाय परत सुरू केला असल्याचे समजले तसेच मनिषा सानप व तिच्या साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे, स्थानिक गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे,स पो नि सुरेखा धस,प्रतिभा चाटे, मनीषा राऊत, चंदा मुळे, वैध्यकीय अधिक्षक मोहम्मद नोमाणी,डॉ गोपाल रांदड ,डॉ राजेश शिंदे सह अन्यजन या कार्यवाहीत सहभागी होते.
