केज शहर व तालुक्यातील वीज पुरवठा दि.06/01/2024 आणि दि.07/01/2024 बंद रहाणार
सकाळी 08:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत
रोखठोक न्युज वार्ताहर
केज नोडल उपकेंद्र अंतर्गत दि.06/01/2024 आणि दि.07/01/2024 रोजी सकाळी 08:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत विज पुरवठा बंद राहील. उपकेंद्राची क्षमता वाढवणे साठी ची कामे केज महावितरण शनिवार व रविवार असे दोन दिवस सलग करणार असल्याने सात तास वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे त्यामुळे विजे वरचे सर्व कामे सकाळी आठ(8) च्या आगोदर करून घ्यावेत.केज शहर ,पिसेगाव, सोनिजवळा ,आणि तांबवा या फिडर वरचे कामे नियोजित असल्याची माहिती महावितरण ने दिली आहे.
