हनुमान वस्ती येथील जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळेला पालकांनी ठोकले कुलूप
रोखठोक न्युज वार्ताहर
दि. 5: तालुक्यातील जिवाचीवाडी येथील हनुमान वस्ती येथे पहीली ते पाचवी पर्यंतची 2 शिक्षकी ,जि.प.ची.प्रा.शाळा आहे.या शाळेवरील एका शिक्षकाची निवडणुक कामासाठी नियुक्ती केली असलेने पालकांनी शाळेला दि. 5 रोजी सकाळी कुलूप ठोकून शाळा बंद करून हनुमान वस्ती येथील पालकांनी तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे शिक्षकाची केली मागणी.
केज तालुक्यातील लव्हुरी केंद्रातील जीवाचीवाडी अंतर्गत हनुमान वस्ती येथे पहीली ते पाचवी पर्यंतची जि.प.प्रा.शाळा ही गावापासून 5 कि.मी.अंतरावर दुर्गम व डोंगरी भागात आहे,त्या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत होते.मात्र तहसीलदार यांनी शिक्षण विभागास पाठविलेल्या शिक्षकाच्या यादी व्यतिरिक्त व बीईओ च्या परस्पर या शाळेवरील एका शिक्षकाची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी दहा-बारा शिक्षक स्टाप संख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कार्यरत मोठया शाळा आसताना त्या शाळांना वगळून व त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन दोन शिक्षकीच शाळेतील शिक्षकाची तहसिलदारांनी नियुक्ती का केली ?या बद्दल उलट,सुलट चर्चेला उधान आले आहे.व निवडणूक कामासाठी हनुमान वस्ती येथीलच शिक्षकाची नियुक्ती का? करण्यात आली. असा संभ्रम व प्रश्न वस्ती वरील पालकांस पडलेला आहे. एक शिक्षक कार्यालयीन कामकाजासाठी बैठका,टपाल देणे,ऑनलाईन ची कामे करणे किंवा किरकोळ रजेवर गेले तर ही शाळा बंद ठेवली जाते.
त्यामुळे नियुक्ती केलेल्या हनुमान वस्ती वरील शिक्षकाची नियुक्ती रद्द करुन बहुसंख्य शिक्षक असलेल्या शाळेतील शिक्षकाची निवडणुक कामासाठी नियुक्ती करावी.अशी मागणी येथील पालकांनी तहसिलदार,व गटशिक्षणाधिकारी यांचेकडे निवेदना द्वारे केली आहे.
चौकट
अध्यक्ष,शाळा व्यावस्थापन समिती व पालकांनी शाळेला कुलुप ठोकले.हनुमान वस्ती वरील शाळेतील शिक्षक महावीर उत्तम मोहीते यांची नियुक्ती रद्ध होत नाही,जो पर्यंत शाळेवर दोन्ही शिक्षक हजर होत नाहीत.तो पर्यंत शाळेला बेमुदत कुलूप ठोकून शाळा बंद केली असल्येचे अध्यक्ष,शाळा व्यावस्थापन समिती व पालकांनी सांगीतले आहे.