• Tue. Aug 25th, 2026

केज शहर व ग्रामीणच्या हद्दीत अवैध धंदे जोमात; पोलीस यंत्रणा कोमात ! एएसपी कमलेश मिना यांच्या कडून खूप अपेक्षा आहेत. मटक्याचा धंदा बिनधास्त सुरू 

Bybaba maske

Jan 8, 2024

केज शहर व ग्रामीणच्या हद्दीत अवैध धंदे जोमात; पोलीस यंत्रणा कोमात !

एएसपी कमलेश मिना यांच्या कडून खूप अपेक्षा आहेत.

मटक्याचा धंदा बिनधास्त सुरू 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अनेक भागात मटक्याचा जोर वाढला आहे. सर्वच धाब्यावर दारू पिण्याचे लायसन्स देण्यात आले आहेत का? पत्त्याचे क्लब, गुटक्याची तस्करी, यासह गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी डोके वर काढले आहे. 

अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांनी आपल्या कर्तव्य निष्ठेने पोलीस विभागाची मान नेहमीच उंचावली होती. गुन्हेगारांना वचक निर्माण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अहोरात्र झटत होते. मात्र त्यांच्या बदलीने 

वचक संपला आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत असून केज शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत कोणताही अवैध धंदे करा व हप्ते साहेबांना पोहोचवा असा संदेश तर दिला जात नाही ना? खाकी वर सर्वसामान्यांचा विश्वास आहे. मात्र केज शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील धंदे पाहून तो विश्वास डळमळीत झाला असल्याची दिसून येत आहे.

पंकज कुमावत यांची बदली होऊन थोडासा कालावधी लोटताच शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात सुरू झाले आहेत. पान टपऱ्या, छोटे हॉटेल्स या ठिकाणी मटक्यांच्या एजंट यांनी आपले पंटर तयार केले आहेत. तर केज शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील प्रत्येक धाब्यावर खुलेआमपणे दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे.

केज पोलिसांच्या नजरेसमोर हा सर्व प्रकार सुरू आहे. प्रत्येक भागात बीट अंमलदारांची नियुक्ती अवैध धंदे रोखण्यासाठी करण्यात आलेली आहे.

मात्र याचा गैरफायदा घेतला जात आहे का? पवार साहेब हलकट लोकांमुळे केज पोलीस बदनाम होत आहे का? केज शहर व ग्रामीण पोलिसांची नाचक्की करणाऱ्या व अवैध धंद्यांना बळकटी देणाऱ्या पोलिसांना घरचा रस्ता दाखवा. केज पोलिसांचा गुन्हेगारावरचा वचक संपला असल्याचे दिसून येत आहे. ठाणे प्रमुख म्हणून आपली जबाबदारी सुव्यवस्था ठेवण्याची व कायदा व सुव्यवस्थेबाबत आहे. याकडे जरा गांभीर्याने पहा. केज शहर व ग्रामीण पोलीस च्या हद्दीत असलेल्या धंद्यांना कायम बंद करण्यासाठी मोहीम काढा.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!