रोखठोक न्युज चा दणका 5 स्टोन क्रशर तहसीलदाराने केले सिल.
रोखठोक न्युज प्रतिनीधी करणार पंचनामा.
रोखठोक न्युज
केज तालुक्यात विनापरवाना 5 स्टोन क्रशर चालु होते त्यात शासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान होत होते.केज तालुक्यात 9 स्टोन क्रशर चालत होते.त्या मध्ये 4 स्टोन क्रशर हे शासनाच्या नियमानुसार वैध होते.व खानपट्टा धारक होते.पण यातील 5 स्टोन क्रशर धारक वर्षानो वर्ष क्रशर चालवून व अवैध उत्खनन करून शासनाचा महसूल बुडतवत होते.नोव्हेंबर महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांने 66 अवैध चालणाऱ्या स्टोन क्रशर व खान पट्टे धारकावर कारवाई केली होती व क्रशर बंद केले होते.पण केज तालुका त्यातून वगळला होता.का वगळला ते अनुत्तरीत होता पण रोखठोक न्युज ने याचे चौकशी करून स्टोन क्रशर धारकाचा चेहरा समोर आणून लगातार बातम्या केल्या त्या नंतर केज तहसीलदार यांनी या पाच स्टोन क्रशर वर कारवाई केल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले आहे.लवकरच रोखठोक न्युज चे प्रतिनीधी स्पाॅट पंचनामा करणार व सत्य उजेडात घेऊन येणार.
