• Fri. Apr 24th, 2026

केज नगरपंचायत स्वच्छतेत झाली नापास 

Bybaba maske

Jan 15, 2024

केज नगरपंचायत स्वच्छतेत झाली नापास

रोखठोक न्युज वार्ताहर

स्वच्छ सर्वेक्षण 2023 चा निकाल 11 जानेवारी रोजी जाहीर झाला आहे त्यात केज नगरपंचायत ची कामगिरी असमाधानकारक आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत शहराचा क्रमांक घसरला आहे.नगरपंचायत नियोजनाचा”कचरा” झाल्याचे यावरून दिसत आहे.केंद्र शासनाकडून प्रत्येक वर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येते.2023 या वर्षात जून ते सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविली.केंद्राच्या पथकाने शहरातील विविध भागात जाऊन तपासणी केली शिवाय पहाणी करून नागरिकांशी संवाद साधला यामध्ये पथकाला असमाधानकारक बाबी दिसून आल्या याचे गुणाकण केल्यानंतर 11 जानेवारी रोजी केंद्र शासनाकडून शंहराचा निकाल जाहीरी केला त्यात केज नगरपंचायतची कामगिरी मात्र खराब दिसून आली.मुख्यधिकारी,पंचायत अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारा मुळे शहराचा रँक घसरला आहे.2022 रोजी 193 रँक वर असलेली केज नगरपंचायत 2023रोजी 212 नंबर वर घसरली आहे.नगरपंचायत कडून नागरिकांना स्वच्छता व इतर सुविधा पुरविल्या जात नसल्याचे या निमित्ताने उघड झाले.

काय तपासले जाते?

केंद्र शासनाच्या पथकाला अचानक एखादा परिसर दिला जातो. तेथे जावून त्याची ऑनलाईन तपासणी केली जाते. यामध्ये नालीची स्वच्छता, रस्ते, शौचालये, स्वच्छतागृहे, ओला व सुका कचरा वेगळा केला जातो का, त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का, त्याचा पूनर्वापर होतो का आदींची तपासणी केली जाते. नागरिकांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!