• Tue. Aug 25th, 2026

मोटार सायकच्या डिग्गीतून ३ लाख रु लांबविले

Bybaba maske

Jan 17, 2024

मोटार सायकच्या डिग्गीतून ३ लाख रु लांबविले

रोखठोक न्युज वार्ताहर 

गौतम बचुटे/केज :- केज येथून आज सकाळी ११:०० वा. च्या सुमारास मोटार सायकच्या डिग्गीतून ३ लाख रु लांबविल्याची घटना घडली आहे.

केज तालुक्यातील एकुरका येथील सर्जेराव केदार व मुलगा संदिप हे बुधवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ११:१५ वा. केजला आले होते. सर्जेराव केदार यांनी त्यांच्या रोजा मोहल्ला केज येथील स्टेट बैंक ऑफ इंडीया शाखेच्या दोन वेगवेगळ्या खात्यातून तीन लाख रु. काढले आणि ते मोटार सायकलच्या डिग्गीत ठेवले. नंतर ते दोघे बाप-लेक मोटारसायकल वरून केज-बीड रोडवरील, कानडी चौक जवळ असलेल्या कांचन मेडीकल स्टोअर्सवर औषधी गोळ्या घेण्यासाठी गेले. दरम्यान औषधी घेऊन ते परत मोटारसायकल जवळ आले असता त्यांना मोटार सायकलची डिक्कीची चैन उघडी असल्याचे दिसून आले. त्यांनी डिक्कीत आत पाहिले असता डिक्कीत ठेवलेले तीन लाख रुपये दिसुन आले नाहीत. सदर रक्कम ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले.

या प्रकरणी सर्जेराव केदार यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्या वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं २४/२०२४ भा दं वि ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!