• Fri. Apr 24th, 2026

डुकराने दिलेल्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू 

Bybaba maske

Jan 18, 2024

डुकराने दिलेल्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू 

रोखठोक न्युज वार्ताहर 

 शेतातून दूध घेऊन मोटारसायकलवरून घराकडे जात असताना डुकराने धडक दिली या धडकेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळवाडी फाट्यावर सोमवार दि. 15 जानेवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली

आहे. बालासाहेब रा. वाघाळवाडी, घटनेत मृत्यू व्यंकटराव चव्हाण (वय 45, ता. अंबाजोगाई) असं डुकराने धडक दिलेल्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बालासाहेब चव्हाण आणि त्यांचा भाऊ यांना अंदाजे 16 एकर शेती आहे. त्यांच्याकडे तीन म्हशी आहेत. नेहमी प्रमाणे बालासाहेब चव्हाण हे दूध घेऊन त्यांच्या मोटारसायकल वरून सोमवारी सायंकाळच्या दरम्यान घराकडे जात होते यावेळी वाघाळवाडी फाट्यावर आले असता त्यांच्या मोटारसायकलला डुकराने जोराची धडक दिली या धडकेत ते खाली पडले त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!