• Tue. Aug 25th, 2026

घरावर पेट्रोल बोळे फेकत मोटारसायकल जाळली. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकावर गुन्हा दाखल

Bybaba maske

Jan 19, 2024

घरावर पेट्रोल बोळे फेकत मोटारसायकल जाळली.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकावर गुन्हा दाखल

रोखठोक न्युज वार्ताहर 

अंबाजोगाई येथील दीनदयाल कॉलनीत घराच्या पोर्च मद्ये घुसून मोटरसायकल जाळून, घरावर पेट्रोलचे बोळे फेकणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे.हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार वैमनस्यातून घडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आरोपी शिक्षकास काही वर्षांपूर्वी राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

 

येथील योगेश्वरी नूतन विद्यालयातील शिक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार दिनकर वासुदेव जोशी हे दीनदयाल कॉलनीत राहतात. ते त्यांच्या घरात झोपलेले असताना त्यांच्याच शाळेतील शिक्षक कमलाकर कोंडीबा राऊत यांने त्यांच्या घराच्या पोर्चमध्ये जाऊन पेट्रोलचे बोळे टाकून मोटारसायकल पेटविली व उडी मारून पळून गेला. या आगीत एम.एच.४४, व्ही,८६३२. या क्रमांकाची ड्रीम न्युयो होंडा कंपनीची मोटार सायकल जाळून खाक झाली. या घटनेत जोशी यांचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.मात्र हा प्रकार घडल्यानंतरही दुसऱ्या दिवशी पुन्हा राऊत यांने जोशी यांच्या घरावर पेट्रोलचे पेटलेले बोळे फेकले. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दिनकर जोशी यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याच शाळेत शिक्षक असलेल्या कमलाकर कोंडीबा राऊत याच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

राऊत यास राष्ट्रपतींचा आदर्श शिक्षक पुरस्कार

दरम्यान, आरोपी शिक्षक कमलाकर राऊत हा पीएचडी धारक उच्चशिक्षित शिक्षक असून त्याचे शिक्षण कार्यातील योगदान लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतींचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्व्वोच्च पुरस्कार प्राप्त शिक्षकावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!