• Tue. Aug 25th, 2026

गावी निघालेल्या दाम्पत्याला अडविले; पतीला मारहाण, तर पत्नीवर अत्याचार

Bybaba maske

Jan 20, 2024

गावी निघालेल्या दाम्पत्याला अडविले; पतीला मारहाण, तर पत्नीवर अत्याचार

रोखठोक न्युज वार्ताहर 

 दुचाकीवरून गावाकडे जाणाऱ्या जोडप्याला तिघांनी रस्त्यात अडवले. पतीला बेदम मारहाण करत ३८ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नांदूर विठ्ठलाचे या रस्त्यावर घडली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. यातील दोघे अल्पवयीन आहेत.

आष्टी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेले दाम्पत्य गुरूवारी कामानिमित्त अहमदनगरला गेले होते. रात्री उशिरा गावाकडे येत असताना बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदूर विठ्ठलाचे येथे अज्ञात तिघांनी दुचाकी अडवली. त्यानंतर पतीला बेदम मारहाण केली, तर पत्नीला तिघांपैकी एकाने मारहाण करून अत्याचार केला. ही माहिती अंभोरा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन जखमी दाम्पत्याला उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

दरम्यान, अंभोरा पोलिसांनी तत्काळ पथके नियुक्त करुन तिन्ही आरोपींना २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याचे सहायक निरीक्षक महादेव ढाकणे म्हणाले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!