कोणत्याही वस्तूची किंमत आणि त्याची व्हॅल्यू ओळखण्याची सोपी गणितीय पद्धत
वस्तू स्वस्त की महाग कसे ओळखतात ते शिका!
रोखठोक न्युज विषेश
सध्या मार्केट मध्ये खास करून पॅकेज फूड, खाद्य पदार्थ या च्या मागच्या बाजूला असलेल्या माहितीवर एक विशेष प्रकारे त्या वस्तूची व्हॅल्यू प्रिंट केलेली असते.
त्या वरून आपण ती वस्तू स्वस्त आहे की महाग हे सोप्या गणितीय पद्धतीने सहज पणे ओळखू शकतो.
गणितात ऍव्हरेजिंग रुल आहे ज्यात नंबर अव्हेरज करत गेल्यावर ठराविक इटरेशन नंतर तो अव्हेरज जवळपास स्थिर व्हायला लागतो.
१ ते १०० आकड्यांमध्ये आपण ३ सामान भाग केले तर ३३ – ६६ – ९९ असे ते ऍव्हरेज आकडे येतात जे ठराविक सेट मध्ये स्थिर असतात.
आता वस्तूची किंमत जिथे लिहिली असते त्या खाली तुम्हाला पर ग्रॅम व्हॅल्यू सुद्धा लिहिलेली दिसेल जी आपल्याला महत्वाची आहे.
आता या वरून स्वस्त, महाग कसे ठरवावे ?
१] वस्तूची पर ग्रॅम किंमत ०.३३ रुपये किंवा त्या पेक्षा कमी असेल ती वस्तू स्वस्त आहे असे म्हणू शकतो – (हे सहज खरेदी करू शकता)
२] वस्तूची पर ग्रॅम किंमत ०.३३ रुपये ते ०.६६ रुपये मध्ये असे ती वस्तू योग्य किमतीत आहे असे म्हणू शकतो – (हे गरजे प्रमाणे खरेदी करा)
३] वस्तूची पर ग्रॅम किंमत ०.६६ रुपये ते ०.९९ रुपये मध्ये असेल ती वस्तू महाग आहे असे म्हणू शकतो – (हे आवश्यकता असेल तरच खरेदी करा)
४] काही ठराविक वस्तूची पर ग्रॅम किंमत ही १ रुपया पेक्षाही जास्त होते अशा वस्तू खूप महाग असे मानू शकतो – (याचा दुसरा ऑप्शन बघा नसेल तर बजेट प्रमाणे खरेदी करा)
वरील गणितीय पद्धत यासाठी उपयोगी आहे की आपण बऱ्याचदा मोठ्या पॅकेट वाल्या वस्तूची किंमत बघून त्या घेणे टाळतो परंतु त्याची पर ग्रॅम व्हॅल्यू कदाचित ०.३३ रुपये पेक्षा कमी असू शकते त्यामुळे ती स्वस्त आहे असे म्हणता येईल परंतु आपण केवळ मोठी प्राईस म्हणून ती वस्तू न घेता छोटे पॅकेट किंवा इतर काही घेतो असे बघायला मिळते.
यात अर्थातच तुमचे बजेट आणि तुमची गरज या मुख्य बाबी आहेतच परंतु प्रत्येक वस्तूची पर ग्रॅम मूल्य बघायची सवय लावून घ्या आणि त्या प्रमाणे शॉपिंग करा तर जास्त फायदा होईल आणि महागाई मध्ये सुद्धा एक प्रकारे स्वस्त कसे निवडावे याचाही अंदाज तुम्हाला येईल.
लिक्विड माल (कोल्ड्रिंक, शाम्पू, सरबत) च्या बाबतीत पर ग्रॅम च्या ऐवजी पर मिलीलिटर किंमत बघा आणि वरील प्रमाणे ठरावा.
वरील प्रमाणे सोप्या गणितीय पद्धतीने तुम्ही खरेदी केल्यास एक प्रकारे विन-विन सिच्युएशन सारखे वाटेल आणि ऍव्हरेजिंग च्या गणिताचा व्यवहारात कसा उपयोग झाला हे सुद्धा समजेल.
वरील माहिती आवडल्यास तुमच्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करा आणि त्यांना सुद्धा या प्रकारे शॉपिंग करण्यासाठी सांगा.
