आमदार नमिताताई यांच्या समोर रणरागिणी महिलाने केली नगरपंचायतच्या सुविधेची पोल खोल.
रोखठोक न्युज वार्ताहर

केज नगरपंचायत तर्फे आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत केज नगरपंचायत अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ते व नालीच्या कामाचा शुभारंभ केज मतदार संघातील कर्तव्यदक्ष आमदार नमिताताई मुंदडा,अक्षय मुंदडा यांच्या हस्ते केज शहरातील जे.के.फँक्शन हाॅल येथे आयोजित करण्यात आला होता.हळदी कुंकू असल्याचे सांगुन सर्व महिलांना आमंत्रित केल्याचे महिलात चर्चा आहे.याच वेळेस सर्व मान्यवरांचे भाषण चालू असताना ज्योती अशोक सत्वधर वार्ड क्रमांक 14 येथील ही महिला बसल्या जागीच काही प्रश्न उपस्थित करत होती.परंतु सूत्रसंचालन करणारे हास्यकवि म्हणून प्रसिद्ध असणारे अजिमोद्दीन इनामदार यानी ज्योती सत्वधर यांना मंचावर येऊन बोलण्याची विंनती केली.मंचावर जाताच ज्योती सत्वधर यांनी माईक वरून वार्ड क्रमांक 14 येथील समस्या व पाण्या विषयी नगराध्यक्ष व जनविकास चे सर्वेसर्वा यांच्या समोर आमदार नमिताताई समोर नगरपंचायतच्या अडीच वर्षाचा पाढा वाचण्यास सुरूवात करताच नगराध्यक्ष व सर्वेसर्वा यांची तंतरली व दोघे ही ऊठून ज्योती सत्वधर यांची भर सभेत मंचावर समजूत काढायला लागले व कसे तरी लवकरच तुमच्या तक्रारीच दखल घेऊन काम करतो असे अश्वासन देऊन पुढील कार्यक्रमाकडे वळले पण आमदार नमिताताई यांच्या समोर झालेल्या नगरपंचायत चा पोकळ विकासाचा गप्पाचा घातलेला चेहरा ज्योतीताई सत्वधर या रणरागिणी मुळे समोर आला.आज शहरातील नागरिक याच विषयावर शहरात चर्चा करताना दिसुन येत होते.त्या नंतर सांगण्यात आले की हळदी कुकांचे कुठलेही आमिष दाखवले नव्हते तर मग ऐवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त महिलांची ऐवढी उपस्थित कशी असा प्रश्न निर्माण होतो?
