• Fri. Apr 24th, 2026

उंदीर मारण्याचे औषध देऊन दोन चिमुकल्यांची हत्या चुलतीसह एका महिलेवर गुन्हा दाखल

Bybaba maske

Jan 22, 2024

उंदीर मारण्याचे औषध देऊन दोन चिमुकल्यांची हत्या

चुलतीसह एका महिलेवर गुन्हा दाखल

रोखठोक न्युज वार्ताहर 

जुना बदला घेण्यासाठी शेजारी राहणार्या एका महिलेने मयत मुलांच्या चुलतीशी संगनमत करून दोन चिमुकल्या बहिण-भावांना उंदिर मारण्याचे औषध देवून ठार मारले. ही धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे घडली. याप्रकरणी मयतांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघींवर तलवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी

येथील तनुजा अमोल भावले (वय २ वर्ष) आणि किशोर अमोल भावले (वय १३ महिने) अशी मयतांची नावे आहेत. त्यांना त्यांच्याच चुलतीने उंदिर मारण्याचे औषध चाटवून त्यांना जिवे मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शेजारी राहणाऱ्या सखुबाई भावले हिने मयतांची चुलती आहे.

स्वातीला ‘मी तुला ४ लाख रूपये देईल, तेवढं काम कर, तुझा कोणाला संशय येणार नाही, तू असे केल्यास तुझी जाव येथे राहणार नाही, मग तू एकटीच इथे राहशील असे सांगितले’ त्यानुसार सखुबाई भावले आणि स्वाती भावले या दोघींनी संगनमताने कट रचला आणि २९ डिसेंबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास सखुबाई हिने आणून दिलेले उंदिर भारण्याच्या ट्युबमधील औषध स्वाती हिने बोटावर काढून ननुजा आणि किशोर या दोघांना चाटविले. त्यानंतर त्यांना उलट्या झाल्या आणि उपचार सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला. अशी तक्रार मयत मुलांचे वडिल अमोल सुखदेव भावले यांनी तलवाडा पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून सखुबाई ज्योतीराम भावले, स्वाती उमाजी भावले (माहेरकडील राव-स्वाती गोरख झिंजे) (रा. पांढरवाडी, ता. गेवराई) यांच्याविरुध्द कलम ३०२, १०२-ब, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल नाला आहे. याप्रकरणी सपोनि शंकर वाघमोडे यांच्या नार्गदर्शनाखाली पोउपनि स्वप्निल कोळी, महेश झिखरे,नारायण काकडे, हजारे, घोषिर, घोडके, मदने पुढील तपास करत आहेत. याप्रकरणात दोन्ही महिला आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

चुलतीसह शेजारच्या महिलेने बदला घेण्यासाठी रचला प्लॅन 

सुरुवातील या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. १९ जानेवारी रोजी मयत मुलांची चुलती स्वाती उमाजी भावले ही शेतात काम करत असताना तिला मारहाण करण्यात आली. किशोर, तनुजा यांच्या मृत्यूबद्दल कुणाला काही सांगू नसे यासाठी शेजारील सखुबाई ज्योतीराम भावले हिने दोन अनोळखी मुलांना मारहाण करण्यासाठी पाठवल्याचे सांगितले. कारण दीड महिन्यापुर्वी शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हिने स्वातीचा सासरा सुखदेव भावले याने माझी लेक वैशाली हिला नांदु दिले नाही. मला त्याचा बदला घ्यायचा आहे. असे म्हणून मयत मुलांची चुलती स्वाती हिला मुलांना औषध खावू घालण्यास सांगितले. मात्र स्वातीने नकार दिला. त्यानंतर तिला अमिष दाखवून या कामासाठी तयार केले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!