नुमान चाऊस यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
रोखठोक न्युज वार्ताहर
शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांच्या मान्यतेने नुमान अली चाऊस यांची बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची विद्यमान स्थिती बिकट असताना मा. खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रभर सर्वसामान्यांचे मुद्दे उचलत असतो व सर्व सामान्य, शेतकऱी, युवकांना न्याय देण्याचा काम करतो तसेच येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक कार्यात व जनसामान्यात ओळखीचे असलेल्या लोकांना पक्षाची जबाबदारी दिली जात आहे. याचाच भाग म्हणून नेहमी सामाजिक मुद्दे उचलणारे व समाजकार्यात पुढे असणारे मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. चाऊस यांच्या निवडी बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या क्षिरसागर, माजी आमदार सय्यद सलीम साहेब, माजी आमदार उषाताई दराडे, सामाजिक नेत्या सुशीलाताई मोराळे, माजी आमदार राधाकृष्णजी होके पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दयानंदजी स्वामी, बीड जिल्हा सरचिटणीस कचरूजी खळगे, माजलगावचे माजी नगराध्यक्ष मंजूर भाई शेख, माजलगाव विधानसभा अध्यक्ष नारायणजी डक, डॉ. नरेंद्र काळे, गंगाभिषण थावरे, रविकांत राठोड, शहराध्यक्ष शकील भाई कुरेशी, डॉ. भगवानराव सरवदे, युवक तालुकाध्यक्ष मनोज फरके व आदींनी शुभेच्छा दिल्या.
