• Thu. Jun 4th, 2026

30 हजारांची लाच घेताना लिपीक जेरबंद. उपविभागीय कार्यालयात गौण खनिज मध्ये मोठा भ्रष्टाचार.

Bybaba maske

Jan 24, 2024

30 हजारांची लाच घेताना लिपीक जेरबंद.

उपविभागीय कार्यालयात गौण खनिज मध्ये मोठा भ्रष्टाचार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

येथील उपविभागीय कार्यालयातील लिपीकास तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांनी रंगेहात पकडण्याची घटना बुधवार दिनांक 24 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली. कारवाई होत असताना येथील उपविभागीय अधिकारी नीलम बाफना या मात्र जेवता जेवताच फरार झाल्या असल्याचे येथे उपस्थित नागरिकांमधून ऐकावयास मिळाले त्यामुळे छोटा मासा गळाला.. मोठा मासा पळाला अशी चर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय परीसरात ऐकावयास मिळत आहे. पकडलेले वाळूचे वाहन सोडविण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी उपविभागीय कार्यालय माजलगाव येथील लिपीक वैभव बाबुराव जाधव यास सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार दिनांक 24 रोजी दुपारी साडेतीन वाजता रंगेहाथ पकडले. यावेळी एसडीएम नीलम बाफना या जेवण करत होत्या व कार्यवाही होत असल्याचे कळताच त्या पटकन येथून एका खाजगी मोटरसायकलवर फरार झाल्याचे येथील काही उपस्थितांनी सांगितले. दरम्यान येथील उपविभागी कार्यालयामध्ये गौण खनिज आणि जात पडताळणीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालत होता याबाबत अनेक तक्रारी देखील झालेले आहेत तसेच या कारवाई त जो कर्मचारी पकडला आहे तो वैभव जाधव याची सहा महिन्यापूर्वी येथील तहसील कार्यालयात आयुक्त यांच्याकडे झालेल्या तक्रारीवरून बदली झालेली आहे परंतु त्यास केवळ अर्थ जमाविण्याचे काम हे व्यवस्थित बिनबोभाट जमत असल्यामुळे त्याला या कार्यालयातून तहसील कार्यालयात जाऊ दिले नाही अशी चर्चा असून या कार्यवाहीदरम्यान छोटा मासा जरी गळाला लागला असला तरी मोठा मात्र पळाल्याने पुढे यात काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपविभागीय कार्यालयावर लाचलुचपची दुसरी कार्यवाही

येथील उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा मोठा सावळा गोंधळ कायम सुरू असतो याबाबत तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात असतात परंतु कार्यवाही मात्र थातुर मातुर होते त्यामुळे येथील अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे बळ वाढते या अगोदरही अशाच तक्रारी झाल्याने उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना देखील लाच लुचपत विभागाने पकडले होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!