• Fri. Apr 24th, 2026

अंध व अपंगाला मारहाण करून घर तोडले. प्रजासत्ताक दिनी तहसील समोर आमरण उपोषण. पोलीसांनी फिर्याद न घेता हाकलून लावले.

Bybaba maske

Jan 26, 2024

अंध व अपंगाला मारहाण करून घर तोडले.

प्रजासत्ताक दिनी तहसील समोर आमरण उपोषण.

पोलीसांनी फिर्याद न घेता हाकलून लावले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

तांबवा तालुका केज येथील रहिवाशी विष्णू शेषराव ओव्हाळ हे तांबवा येथील आपल्या जागेत पत्र्याचा निवारा करून रहातात.तिथे रावसाहेब लांब व त्याचे साथीदार आले व अंध व अपंग असलेल्या विष्णू व त्याच्या घरच्यांना तु येथे कसा रहातोस तुझी येथे रहाण्याची लायकी नाही,असे म्हणून त्याला जातीवाचक शिव्या देऊन त्याला त्याच्या कुटुंबाला बेदम मारहाण केली व त्यानी रहाण्या साठी केलेला पत्र्याचा निवारा मोडून टाकला.तसेच ते फिर्याद देण्या साठी पोलीस ठाण्यात गेले असता बीट अंमलदार दौंड व पीएसआय आनंद शिंदे यानी फिर्याद न घेता  पोलीस ठाण्यातून हाकलून लावले असे तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.त्यामुळे विष्णू ओव्हाळ व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रजासत्ताक दिनीच केज तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यास प्रारंभ केला आहे.जर दिव्यांग व्यक्तीना प्रजासत्ताक दिन जर न्याय भेटत नसेल तर याला काय म्हणावे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!