• Fri. Apr 24th, 2026

तरुणीचे अश्लील फोटो पाठविले • भावाच्या मोबाइलवर. होणाऱ्या पतीच्या मोबाईल  पाठवले फोटो लग्न मोडले.

Bybaba maske

Jan 31, 2024

तरुणीचे अश्लील फोटो पाठविले • भावाच्या मोबाइलवर.

होणाऱ्या पतीच्या मोबाईल  पाठवले फोटो लग्न मोडले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

धारूर येथील रहिवासी असलेल्या व सध्या पुण्यात बीटेकचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या भावाच्या मोबाइलवर पाठवून बदनामी करण्यात आली. हा प्रकार ११ जानेवारी रोजी घडला. याप्रकरणी केजच्या तरुणाविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

धारूर येथील तरुणी शिक्षणासाठी होती. शाळा, महाविद्यालयात जाण्याच्या रस्त्यावर असणाऱ्या दुकानातील आशिष महादेव तेलंग या तरुणासोबत तिची ओळख झाली. नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सप्टेंबर २०२३ मध्ये हे प्रकरण दोघांच्याही घरी समजले. त्यामुळे तरुणीच्या वडिलांनी तिचे लग्न जमवून साखरपुडाही केला. तरुणीच्या होणाऱ्या पतीने दोघांचे फोटो सोशल मीडियावर टाकताच ते आशिष याने पाहिले. नंतर त्याने होणाऱ्या पतीच्या मोबाइलवर व्हिडीओ आणि फोटो पाठविले. त्यामुळे या तरुणीचा जमलेला विवाह मोडला. एवढ्यावरही आशिष शांत राहिला नाही. त्याने तरुणीच्या भावाच्या मोबाइलवर ११ जानेवारी रोजी अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठविले. हा प्रकार समजताच पीडित तरुणीने सायबर ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोनि संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शैलेश जोगदंड, निशिगंध खुळे, गिरी आदी करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!