शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ निशाणी
रोखठोक न्युज वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने आज ‘तुतारी फुंकणारा माणूस’ ही निवडणूक निशाणी दिली आहे. सर्वेच्च न्यायालयाने याबाबत निवडणूक आयोगाला निर्देश दिले होते.
पुढील आदेश येईपर्यंत आणि आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला हे नवे चिन्ह वापरता येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने आणि ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे, असे ट्विट पक्षाने केले आहे.
