• Sat. Apr 25th, 2026

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सावळेश्वर,आवसगाव,नायगाव रस्त्या,पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे.  सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन फक्त नाव, काम वेगळाच गुत्तेदार करतोय. जिवाचीवाडी  रस्त्याचे काम ही केले होते निकृष्ट.

Bybaba maske

Feb 23, 2024

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सावळेश्वर,आवसगाव,नायगाव रस्त्या,पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे.

 सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन फक्त नाव, काम वेगळाच गुत्तेदार करतोय.

जिवाचीवाडी  रस्त्याचे काम ही केले होते निकृष्ट.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील सावळेश्वर,आवसगाव,नायगाव या नवीन रस्ता व पुलाचे काम धाराशिव स्धित सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत काम केले जात आहे त्यात सहा सात पुल व रस्ता अश्या प्रकारे कामाचे स्वरूप आहे यात सद्या पुल बांधण्याचे काम चालु आहे.पुल हा एकदम निकृष्ट पद्धतीत बांधला जात आहे पुलाच्या भिंतीचे काँक्रिटीकरण खुपच निकृष्ट आहे यात सिमेंट वापरलेकी नाही हे सांगणे सुद्धा अवघड आहे.

आवसगाव  येथेल सरपंच , ग्रामपंचायत सदस्य व नागरीकांनी कामा जाऊन याची पहाणी कली व या निकृष्ट कामाची पोलखोल झाली.पुला साठी बांधलेल्या भिंतीच काँक्रिटीकरण हाताने निघत आहे.तेसेच पुला मध्ये पाणी वहाण्या साठी जे सिमेंट नळ्या टाकल्या आहेत त्याच्यावर मुरुम न टाकता तीच खोदलेली काळी मातीचा वापर केला आहे

या आगोदर ही याच सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन ने जिवाचीवाडी येथे ही निकृष्ट पद्धतीने डांबरी रस्त्या केला होता तो हाथाने उखडला जात होता.त्यावेळेस ही तेथील गावकऱ्यांनी त्या रस्त्याचे काम बंद केले होते.अश्या या सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन ला शासनाने काळ्या यादीत टाकावे अशी मागणी सावळेश्वरव आवसगाव चे नागरिक करत आहेत.

दुसरी धक्कादायक माहिती अशी की सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन हे काम स्वतः करत नसुन आपल्या कंपनीच्या नावाने टेंडर घेते व पुन्हा कोणाला ही विकते.त्यामुळे स्वतःची जिमेद्दारी संपली असे समजते.कारण ही सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन कोणाचाही तक्रारी साठी फोन केला तर उचलत नाही.कामा वरील सुपरवायझर इगळे हा सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन चे नाव न सांगता स्थानिक पदाधिकारी हे काम करत असल्याचे सांगतो.हे सगळे गौडबंगाल काय आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागास माहीत पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी कुठलीच माहीती देत नाही.साधे किती रूपयाचे काम आहे किंवा कामाची एमबी सुद्धा देत नाहीत.ऐवढ गुप्त पद्धतीत हे काम चालु असते.लवकरच हे निकृष्ट काम कोण करतय व या मागे कोण आहे हे रोखठोक न्युज आपल्या वाचकांपर्यंत लवकरच आणेल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!