गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांची बदली.
प्रज्ञा माने गटविकास अधिकरी माजलगाव यांची ही बदली.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांची बदली जिल्हा धाराशिव वाशी येथे रिक्त ठिकाणी बदली झाली आहे.तर माजलगाव गटविकास अधिकारी प्रज्ञा माने यांची बदली मडणगंड जिल्हा रत्नागिरी येथे झाली.केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे हे अत्यंत मनमिळाऊ शांत प्रेमळ व्यक्तीमत्व होते.केज तालुक्यातील पंचायत समितीत येणाऱ्या अभियगताचे कुठलेच काम ते मागे ठेवत नसत.होत असेल हो म्हणत किंवा नाही म्हणत स्पष्ट वक्ती स्वभाव असल्यामुळे काहीची नाराजी होती.पण कामात पारदर्शकता असल्यामुळे कामे होत असत.
बीड जिल्यात कोठेही मनरेगाची कामे नसताना केज तालुक्यात कामे चालु होती.शासनाची प्रत्येक योजना ही सामान्य माणसापर्यंत कशी पोहचेल याची ते व्यकतीक काळजी घेत.गायगोटा असो की विहीर घरकुल योजनेचा लाभ त्यांच्या काळात भरपूर नागरीकांना झाला.
मधल्या काळात आमदारा बरोबर झालेल्या बेबनावातुन एक महिना सुट्टीवर गेले तेवढेच काय ते नाराजी नाट्य घडले त्या नंतर आमदारा बरोबर जुळवून काम केले.
