• Fri. Apr 24th, 2026

ॲट्रॉसिटी विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळे विरोधात परळीत अखेर गुन्हा दाखल. ब्राह्मण संघटन हे स्वतः ॲट्रॉसिटी ची मागणी करत असताना केतकी ने समाज विरोधात भुमिका मांडली.

Bybaba maske

Feb 29, 2024

ॲट्रॉसिटी विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळे विरोधात परळीत अखेर गुन्हा दाखल. 

ब्राह्मण संघटन हे स्वतः ॲट्रॉसिटी ची मागणी करत असताना केतकी ने समाज विरोधात भुमिका मांडली.

रोखठोक न्युज वार्ताहर 

अनुसूचित जाती आणि जमातीचे कवच कुंडल असणाऱ्या ॲट्रॉसिटी कायद्या विषयी बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मानसिक विकृत अभिनेत्री केतकी चितळे आणि संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे .तमाम आंबेडकरी समाजाच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर पोलिसांना चितेळेवर गुन्हा दाखल करावाच लागला.

   याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 25 फेब्रुवारी रोजी परळीत राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद संपन्न झाली होती .या परिषदेत बोलताना मानसिक विकृत असणाऱ्या व महापुरुषांबद्दल नेहमीच आक्षेपार्ह बोलणाऱ्याअभिनेत्री केतकी चितळे हिने ॲट्रॉसिटी हा पैसे कमावण्याचा साईड बिझनेस आहे .ॲट्रॉसिटीचे रॅकेट आहे .खोट्या ॲट्रॉसिटी दाखल केल्या जातात अशा प्रकारचे बेताल आणि विधान करून तमाम अनुसूचित जाती जमातीचा अवमान केला होता. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

    याबरोबरच मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलकांना येड्याची जत्रा म्हणून संबोधले गेले .व त्यांचा अवमान केला होता.ब्राह्मण संघटन बाकीचा समाज आम्हाला भटूकडा किंवा आमच्या जातीवरून हिणवून बोलतो म्हणून ब्राह्मण संघटन ॲट्रॉसिटी ची मागणी करत असताना केतकी ने समाज विरोधात भुमिका मांडली. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटले होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आले होते.परळी येथील आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्या वतीने परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

    अखेर चार दिवसानंतर आज दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शहर पोलीस स्टेशनला वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संयोजक बाजीराव धर्माधिकारी तसेच बेताल वक्तव्य करणारी केतकी चितळे यांच्या विरोधात कलम 295 (अ) तसेच कलम 505 (2) अन्वये दाखल करण्यात आला आहे. बाजीराव धर्माधिकारी हे धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असून परळी शहर अजित दादा पवार गटाचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत. केतकी चितळे वरील हा गुन्हा म्हणजे तमाम आंबेडकरी समाजाच्या एकजुटीचा विजय म्हणावा लागेल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!