• Sat. Apr 25th, 2026

मांजरा,बोबाटी नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा. तालुक्यातील बोरगाव, प्रिंप्री गावातील प्रकार,प्रशासनाचे दुर्लक्ष.

Bybaba maske

Mar 1, 2024

मांजरा,बोबाटी नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा.

तालुक्यातील बोरगाव, प्रिंप्री गावातील प्रकार,प्रशासनाचे दुर्लक्ष.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील बोरगाव येथील मांजरा नदीतून व पिंप्री येथील बोबाटी नदीतून अवैध वाळू तस्करी होत आहे.या आगोदर वाळू तस्करांच्या बातम्या अनेक दैनिकांमधून प्रसारित करून शासन व प्रशासनाला जागे करण्याचे काम सातत्याने प्रयत्न करण्यात आले पन केज तालुक्यातील बोरगाव, पिंप्री येथील नदी पात्रातील अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरूच आहे. केज तालुक्यातील पिंप्री येथील बंद वाळू नदी पात्रातुन राजरोस पणे वाळू तस्करांनी नदी पात्र पोखरुन टाकली आहे. त्यामुळे प्रशासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवला जात आहे केज तालुक्यातील अवैद्य वाळू तस्करी स्थानिक प्रशासनाच्या डोळ्यासमोर होत असताना सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. केज तालुक्यातील अवैध वाळू तस्करी च्या बाबत कोणताही मंडळ अधिकारी तलाठी कारवाई करण्यास घाबरतात असे तालुक्यातील चित्र आहे. विशेष म्हणजे याबाबत माहिती जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी तहसीलदार ठाणेदार यांना माहीत असून सुद्धा शून्य आहे. रात्रीच्या  वेळी सुद्धा वाळू तस्करी चालू आहे ही नेमकी कोणाच्या आर्शिवादाने चालू आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

चौकट:-

आशीवार्दाने चालू आहे हा मात्र प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे पण कुठल्याही प्रकारची कारवाईदिसून येत नाही रात्रंदिवस आधुनिक यंत्राद्वारे रात्रीच्या अंधारात अवैध वाळू सुरु असते परंतु आमचे प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिकार फोन उचलत नाहीत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!