नगरपंचायतच्या स्थायी समीतीच्या बैठकीत तीन सभापती अनुपस्थित तरी कोरम पुर्ण?
रोखठोक न्युज वार्ताहर
केज नगरपंचायत कार्यालयात आज सर्व नवनिर्वाचित सभापती सह स्थायी समितीची बैठक बोलावली होती या मध्ये शहर अंतर्गत करावायचे कामे,पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, बांधकाम, शिक्षण या विषयावर बैठक व नवीन प्रस्तावित कामा बदल चर्चा करणे हे सर्व अपेक्षित असताना या स्थायी समितीच्या बैठकीला तीन सभापती यात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष शितलताई दांगट,बांधकाम सभापती सोमनाथ गुंड व एक अपक्ष गैरहजर असल्याची बातमी सुत्रा नुसार भेटली आहे.केज नगरपंचायत मध्ये जर तीन सभापती गैरहजर असतील तर बैठकीचा कोरम पुर्ण होत नाही त्या मुळे ही बैठक निष्फळ ठरते तरी सत्ताधाऱ्यांकडून कोरम नसताना कोरम पुर्ण दाखवून बैठक झाल्याचे दाखवल्याचे समजत आहे.
