अभियंता युवराज मळेकर व गुत्तेदारात गुपचूप गुपचूप.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सद्या परिस्थितीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना,महाराष्ट्र सुवर्णजंयती नगरोत्थान योजना,खासदार फंड,आमदार फंड,समाजकल्याण अंतर्गत मागासवर्गीय समाज योजना20-59,22-16 हेड अंतर्गत कोट्यावधी रूपयाचे काम चालु आहेत हे काम फक्त कार्यकारीकारी अभियंता युवराज मळेकर,असिस्टंट अभियंता सचिन कांबळे व काळे असे तिघे मिळून आख्या केज तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पहातात.
असिस्टंट अभियंता सचिन कांबळे हे धारूर तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाचा सुद्धा काम पहातात त्या मुळे याचे पाची बोटे तुपात आहेत.कारण यांच्या शिवाय गुत्तेदाराचे कुठलेच पान हालत नाही.
आता पर्यंत च्या केज तालुक्यातील निकृष्ठ कामाची केलेल्या तक्रारीत ची दखल घेऊन युवराज मळेकर यांनी कुठली कारवाई केली हे युवराज मळेकर कधी सांगु शकाल का असा प्रश्न तक्रारदार उपस्थित करतात तक्रार आली की यांची आमदणी वाढली असे समजून चलायचे.केज सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता युवराज मळेकर कधी तरी बसतात सगळ्या गुत्तेदाराच्या घोळक्यात ते केज विश्रामगृहात मांड ठोकून असतात.सद्या मार्च एण्ड च्या कामची लगबग चालु आहे त्या मुळे सद्या गुत्तेदारात व मळेकर यांच्या मध्ये गुपचूप गुपचूप मोठ्या प्रमाणात चालु आहे त्या मुळे मळेकर साहेबांचा चेहरा दिसने सुद्धा दुरापास्त झाला आहे. पण वसुली अधिकारी सचिन कांबळे जोरात आहेत.तरी केज तालुक्यातील व धारूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे कामे आहेत त्याचे लेखापरीक्षण होऊन बोगस कामे चव्हाट्यावर यावेत व जनतेच्या करातून आलेल्या निधीचा वापर कसा होतो ते जनतेस समजले पाहिजे असे आता जनतेतून बोलले जात आहे.
