सार्वजनिक बांधकाम विभागा मध्ये प्रचंड भ्रष्टाचार.
अभियंता युवराज मळेकर यांनी सचिन कांबळे यांना ठेवले वसुली अधिकारी.
रोखठोक न्युज वार्ताहर
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज मळेकर यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागात प्रचंड गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. अनेक कामात प्रचंड अनिमित्ता असून थातूरमातूर कामे करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठा प्रमाणावर भ्रष्टाचार उघड होऊ शकतो.केज तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयाचे कामे चालु आहेत.तसेच समाज मंदिर, सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत केज शहरात 100 कोटीच्या आसपास कामे चालु आहेत.यात प्रचंड अनियमितता व निकृष्ठ कामे होताना दिसत असुन सार्वजनिक बांधकाम विभागात किती ही तक्रारी आल्या किंवा माहिती अधिकार आलेतरी त्याला फाट्यावर मारण्याचे काम होत आहे.पत्रकारानी किती ही बातम्या केल्या तरी यांच्या खुर्चीला घाम येत नाही.नगरोत्थान योजनेंतर्गत शहरात मनमानी कामे चालु आहेत.कुठ मंजूर असलेला रस्ता भलतीकडेच बनवला जात आहे.रस्ता नाली चे कामे निकृष्ठ दर्जाचे होत आहेत.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जिवाचीवाडी व आवसगाव,नायगाव,सावळेश्वर येथेल सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन चा डांबरीकरण किंवा पुलाचे काम अगदी निकृष्ठ होत आहेत या मधी जिवाचीवाडी च्या गावकऱ्यांनी हाताने डांबरी रस्ता उघडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता.त्याच पद्धतीत आवसगाव येथील सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन च्या निकृष्ठ पुलाच्या संदर्भात सरपंच व ग्रामपंचायत सदस्यानी व्हिडीओ करून कामाची पोलखोल केली होती.यश कन्स्ट्रक्शन,सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन, प्रवीण कंट्रक्शन असे काही लाडाच्या गुत्तेदार कन्स्ट्रक्शन ला यांनी निवडले आहेत ऑफलाइन मधील दहा लक्ष रूपयाची कामे करताना मोठा भ्रष्टाचार आहे.सार्वजनीक बांधकाम विभाग केज मध्ये अक्षरशा नंग नाच चालवलेला आहे.जवळपास 150 कोटी हून जास्त कामाची चौकशी होणे गरजेच आहे.अनेक ठिकाणी कामे न करताच बीले उचलली आहेत तर कुठ थातूरमातूर कामे केली आहेत. युवराज मळेकर व सचिन कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात अक्षरशा नंगानाच चालवलेला आहे.टक्केवारी गोळा करण्याची जबाबदारी सचिन कांबळे यांच्यावर दिली आहे.यांच्या काळातील सर्व कामाची व यांच्या संपत्ती ची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष बाबासाहेब अंबादास मस्के हे मुख्यमंत्र्यांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे करणार आहेत.
