• Fri. Apr 24th, 2026

सहा जखमी पैकी दोघांचा मृत्यू . टिप्पर- रिक्षाचा झाला होता अपघात.

Bybaba maske

Feb 27, 2024

सहा जखमी पैकी दोघांचा मृत्यू .

टिप्पर- रिक्षाचा झाला होता अपघात.

रोखठोक न्युज वार्ताहर 

धारुर तालुक्यातील थेटगव्हाणजवळ अॅपे व टिप्पर समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील संतोष नारायण बडे, रा. गांवदरा (वय 23) या पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाचा समावेश आहे. दुसऱ्या मयतात अंबेवडगाव येथील 85 वर्षीय गवळणबाई शेषराव तिडके या वृध्द महिलेचा समावेश आहे.

धारुर तालुक्यातील थेटेगव्हाण जवळ अॅपे व टिप्परचा आज दि. 27 मंगळवार रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात अॅपेरिक्षामधील सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना येथील धारुर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन अंबाजोगाई येथे हलवण्यात आले. मात्र जखमी पैकी दोघांचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. मयतात अंबेवडगाव येथील 85 वर्षीय गवळणबाई शेषराव तिडके या वृध्द महिलेसह पोलिस भरती होवून उसतोड आईवडीलांच्या हातातील कोयता काढण्यासाठी प्रयत्न करणारा 23 वर्षीय तरुण संतोष नारायण बडे याचा समावेश आहे. अॅपेरिक्षा अपघातग्रस्त झाल्यानंतर संतोषला बाहेर काढून वाचवण्यासाठी त्याचे वडिल नारायण बडे जवळच्याच शेतात उसतोड करत असताना धावून आले व स्वतः जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. संतोषच्या पश्चात आई वडील व दोन बहिणी आहेत. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!